Parents Alert! 📱 मोबाईलमुळे मुलं पेंसिल धरायला विसरतायत ✏️ | 5 smartphone impact

Image Source: Live Science

मुलं चिडचिड करू लागली की हातात मोबाईल किंवा टॅब द्या..लगेच शांत..काम करताना त्रास दिल्यास त्यांना फोन दिला की चिडीचूप..मोबाईल हातात सापडला की रडणं गायप..आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टॅबची स्क्रीन मुलांसाठी बेबीसिटर बनलीये. पालक मुलांना शांत करण्यासाठी, आपल्याला त्रास नको म्हणून किंवा अगदी जेवायला लावण्यासाठी फोन किंवा टॅबलेटचा आधार घेतात. पण कधी विचार केलाय का, या सोयीची किंमत काय आहे?

शाळेतील टिचर्सनी स्किनच्या वापराबाबत धोक्याची घंटा वाजवायला सुरूवात केलीये. एका रिसर्चनुुसार स्कीनमुळे मुलांना पेन्सिल पकडणं, शूचे लेस बांधणं आणि साध्या हालचालींवर नियंत्रण मिळवणं कठीण होत आहे. स्क्रीनचा अतिवापर त्यांच्या बालपणातील खेळ हिरावून घेत आहे आणि त्यांचं शारीरिक व मानसिक वाढीवरही परिणाम करत आहे. आपण नकळत अशी पिढी घडवत आहोत का जी पहिले स्क्रीन स्वाइप करेल आणि नंतर अक्षरे लिहायला शिकेल?

सर्व्हेक्षणात काय आढळून आलं? 

एज्युकेशन वीक, या अमेरिकेतील एज्युकेशन न्यूज आणि माहिती देणाऱ्या वेबसाइटने शाळेतील मुलांबाबत एक सर्व्हेक्षण केलं. यात टिचर्सना मुलांच्या मोटर स्किल्सबाबत विचारण्यात आलं. अमेरिकेतील मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार, मोटर स्किल्स म्हणजे, विशिष्ट कार्ये करण्यासाठी स्नायूंचा वापर करण्याची क्षमता. टिचर्सना प्रश्न विचारण्यात आले की, मुलांना इनस्ट्रक्शन फॉलो करताना त्रास होतो का? कातरी, पेन्सिल या गोष्टी पकडण्यासाठी अडचण येतेय का? बुटाची लेस बांधताना किंवा स्वेटर, कोट घालताना कठीण जातंय का? याबाबत त्यांचं ऑब्जर्वेशन काय आहे याची माहिती विचारण्यात आली. पाच वर्षांपूर्वी याच गोष्टी करताना मुलांना कठीण जात होतं का? याची तुलना करून हे सर्व्हेक्षण करण्यात आलं. एज्युकेशन वीकच्या सर्व्हेक्षणात असं आढळून आलं की, लहान मुलांना कातरी वापरणं, पेन्सिल पकडणं, बुटाची लेस बांधणं यांसारख्या गोष्टी करण्यात खूप अडचण येत आहे. 

टिचर्स काय म्हणाल्या…

77% टिचर्सनी सांगितलं की लहान मुलांना कातरी वापरणं, पेन्सिल पकडणं, क्रेयॉन किंवा पेन वापरण्यात अडचण येत आहे. 

69% टिचर्सच्या माहितीनुसार, मुलांना बुटांची लेस बांधताना खूप कठीण जातंय. 

94% टिचर्सच्या माहितीनुसार, मुलांना इनस्ट्रक्शन फॉलो करताना त्रास होतोय 

85% टक्के टिचर्सच्या मते मुलांना गोष्टी शेअर करण्यात आणि इतरांशी को-ऑपरेट करण्यात खूप अडचण होतेय.

या सर्व्हेक्षणात अमेरिकेतील 1500 पेक्षा जास्त टिचर्सने सहभाग घेतला होता. प्री-के-3 पर्यंत शिकवणाऱ्या टिचर्सनी या सर्व्हेक्षणात प्रश्नांना उत्तरं दिली. 

((https://www.edweek.org/teaching-learning/young-kids-are-struggling-with-skills-like-listening-sharing-and-using-scissors/2024/06))

नॅशनल जिओग्राफीकने या सर्व्हेक्षणाबाबत एक रिपोर्ट जाहीर केला होता. या रिपोर्टच्या माहितीनुसार, मुलांमध्ये प्रामुख्याने ही गोष्ट गेल्या पाच वर्षात दिसून आली आहे. आणि याचं प्रमुख कारण मुलांचा वाढता स्कीन टाईम आहे. ज्यामुळे मुलांचं बाहेर खेळणं बंद झालंय आणि कोव्हिड महामारीदेखील याला कारणीभूत आहे. 

((https://www.mother.ly/child/child-milestones/fine-motor-skills-declining-in-children/))

मुलांमध्ये झालेल्या या बदलाची कारणं काय आहेत?

Motherly, या ऑनलाइन वेबसाइटने मुलांना या महत्त्वाच्या गोष्टी करताना येणाऱ्या अडचणींची कारणं काय? याबाबत तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तज्ज्ञांनी मुलांमध्ये झालेल्या बदलाची प्रमुख चार कारणं सांगितली. 

वाढलेला स्क्रीन टाइम-चित्र रंगवणं किंवा ब्लॉकसोबत खेळण्याऐवजी मुलं मोबाईल, टॅबवर व्हिडीयो पहात बसतात किंवा स्क्रीन टॅप करत बसतात. 

वाचनाची कमी होत असलेली आवड- PEW रिसर्चच्या माहितीनुसार, 9 ते 13 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये वाचनाची आवड गेल्या दशकाच्या तुलनेत कमी झालीये. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, लहान मुलांच्या हातात पुस्तकं दिसत नाहीत. चित्र रंगवण्यासाठी क्रेयॉन नाहीत. लिहीण्याचा सराव नाही. त्यामुळे मुलांचे हे मोटर स्किल्स कमी होत चालले आहेत.  

बाहेर खेळणं कमी होतंय- झाडावर चढणं, मातीत खेळणं यांसारख्या गोष्टींमुळे मुलांचे हात मजबूत होण्यात मदत मिळते. मुंलांचं कोऑर्डिनेशन वाढतं. पण सद्य स्थितीत हे खेळ मुलं खेळत नाहीत. त्यांच्या हातात सतत स्कीन दिसून येतो. त्यामुळे काही वर्षांपूर्वी मुलं जसे हात वापरत होते आता हातांचा तसा वापर केला जात नाहीये. 

लहान मुलांच्या बदललेल्या सवयी- हल्ली बटन किंवा झिपर्स ऐवजी इलॅस्टिक पॅंट वापरल्या जातात. प्री-पॅकेज स्नॅक्सचा वापर वाढल्यामुळे मुलं हातांचा फारसा वापर करत नाहीत. मुलांच्या सवयी बदलल्यामुळे मुलांच्या हातांचा लहान वयात ज्याप्रकारे वापर व्हायला हवा. तसा होत नाहीये. 

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मुलांमध्ये झालेला हा बदल कोरोना महामारीच्या आधीपासून पहायला मिळतोय. पण कोव्हीडमुळे प्ले-डेट्स कमी झाल्या. शाळा ऑनलाइन झाल्या. ज्यामुळे यात लाक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येतंय. 

रिसर्च काय सांगतो? 

मुलांचा वाढता स्क्रीन टाइम आणि मुलांच्या विकासात येणारे अडथळे यावर जगभरातील संशोधकांनी रिसर्च केले आहेत. 2023 मध्ये जामा पिडियाट्रीक्स जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनात १ वर्षापेक्षा कमी मुलांचा स्क्रीन टाइम आणि  विकासात येणारे अडथळे यावर अभ्यास करण्यात आला. यात सात हजाराहून अधिक मुलांचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांना आढळून आलं की,

1 वर्षाच्या मुलांमध्ये वाढत्या स्क्रीन टाइमचा संबंध मुलांच्या विकासात अडथळा निर्माण करण्याशी आढळून आला. मुलांचं कम्युनिकेशन आणि 2 ते 4 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये प्रॉब्लेम-सॉल्व करण्याची आढळून आला. यावरून एक गोष्ट लक्षात आलीये की, स्क्रीन टाइम आणि मुलांचा विकास यावर अधिक संशोधन होणं गरजेचं आहे.    

((https://jamanetwork.com/journals/jamapediatrics/fullarticle/2808593))

कोरोना महामारीच्या काळात मार्च ते डिसेंबर 2020 दरम्यान जन्माला आलेल्या 255 मुलांच्या मोटर स्किलचा अभ्यास साल 2022 मध्ये करण्यात आलेल्या संशोधनात करण्यात आला. हे संशोधन जामा नेटवर्कमध्ये छापण्यात आलंय. संशोधकांना आढळून आलं की, कोरोना महामारीपूर्वी जन्माला आलेल्या मुलांच्या तुलनेत कोव्हिड-19 संसर्गाला एक्सपोज झालेल्या आणि unexposed नवजात बालकांमध्ये ग्रॉस मोटर, फाइन मोटर आणि सामाजिक संबंधांमध्ये खूप कमतरता आढळून आली. 

संशोधकांच्या माहीतीनुसार, कोरोना महामारीच्या काळात जन्माला आलेल्या मुलांच्या न्यूरो-डिव्हेलपमेंटबाबत अधिक अभ्यास होणं गरजेचं आहे. 

((https://jamanetwork.com/journals/jamapediatrics/fullarticle/2787479))

मुलांचे मोटर स्किल्स वाढवण्यासाठी काय करावं? 

मोटर स्किल्स मुलांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मोटर स्किल्स मुलांना दैनंदिन अॅक्टिव्हिटीसाठी मदत करतात. लिहीणं, कपडे घालणं, चित्रकला, खेळणं यासाठी मोटर स्किलची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मग मुलांचे मोटर स्किल्स वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? 

1,000 तासांचं आउटडोअर चॅलेंज- वर्षातून 1,000 तास बाहेर खेळलं पाहिजे. म्हणजे दिवसाला अडीच तासांपेक्षा जास्तवेळ बाहेर खेळलं पाहिजे. playing, climbing, यासारख्या गोष्टी केल्यामुळे मोटर स्किल्स वाढण्यास मदत होते. 

लिहीण्याची किंवा हॅंड रायटिंगचा सराव करण्यापेक्षा मुलांना कापणं, पझल्स सोडवणं, खेळण्यासाठी प्ले-डोचा वापर यांसारख्या गोष्टी केल्या पाहिजेत. 

 नो स्क्रीन अवर (पालकांसाठी सुद्धा) – मुलांनी वाचावं, खेळावं आणि त्यांच्यात चांगले स्किल्स यावेत यासाठी पालकक म्हणून आपल्याला त्यांचं मॉडेल व्हाव लागेल. त्यासाठी टेक-फ्री मॉर्निंग किंवा शाळेतून आल्यानंतर नो स्क्रीन टाइम यासारख्या गोष्टी कराव्या लागतील.  

आर्ट आणि क्राफ्ट चॅलेंज- मुलांसाठी आर्ट आणि क्राफ्ट चॅलेंज तयार केलं पाहिजे. जेणेकरून मुलांची क्रिएटिव्हीटी वाढेल. 

((https://www.mother.ly/child/child-milestones/fine-motor-skills-declining-in-children/))

मोबाईल आणि टॅबच्या अतिवापरामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढीवर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पालकांनी मुलांना डिजिटल स्क्रीनऐवजी खेळ, पुस्तकं, क्रिएटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटीज यांकडे वळवणं गरजेचं आहे. तंत्रज्ञानाचं संतुलित आणि योग्य प्रमाणात उपयोग करण्याची सवय लावणं हेच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे आजच विचार करा—आपण आपल्या मुलांचं बालपण आपल्या सोयीसाठी टेक्नॉलॉजीच्या पडद्याआड लपवतोय का? याचा विचार तुम्हाला-मला प्रत्येकाला करावा लागणार आहे. 

Leave a comment