Sonam Kapoor: बोट्युलिझम म्हणजे काय? एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मध देणं धोकादायक?

काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरचा एक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायर झाला. आणि चर्चा सुरू झाली, एका वर्षापेक्षा लहान मुलांना मध द्यावा का देऊ नये? नवजात मुलांना मध देणं धोकादायक आहे? मुलांना मध दिल्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येतं?

सोनमने, “लहान मुलांना मधामुळे बोट्युलिझम हा आजार होतो. त्यामुळे मी माझ्या मुलाला वर्षभरापर्यंत मध दिला नाही,” असं वक्तव्य केलं. यानंतर वर्षोनवर्ष सुरू परंपरेवर प्रश्न उपस्थित केला असं म्हणत नेटिझन्सनी तिला धारेवर धरलं. सोनमवर सोशल मीडियाची ट्रोलधाड पडली.

भारतात कित्येक वर्षांपासून नवजात मुलांना बाळगुटी पाजण्यात येते. मुलांच्या वाढीसाठी चांगलं म्हणून जवळपास प्रक्येक घरात मुलाला गुटी दिली जाते. काहीवेळा ही गुटी मधात उगाळून दिली जाते. पण तज्ज्ञांच्या मते एका वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मधामुळे ‘बोट्युलिझम’ हा आजार होण्याची शक्यता असते. जागतिक आरोग्य संघटना आणि जगभरातील विविध आरोग्य संस्थांनी देखील नवजात मुलांना मध देऊ नका अशी सूचना केलीये.

Image by vwalakte

परंपरा योग्य का विज्ञान..या चर्चेत बोट्युलिझम म्हणजे काय? एका वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मध धोकादायक आहे? खरचं मधामुळे बोट्युलिझमचा धोका उद्भवतो? या लेखाच्या माध्यमातून मी जागतिक आरोग्य संघटना, जगभरातील महत्त्वाच्या आरोग्य संस्था याबाबत काय म्हणतात, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

“मी मुलाला मध दिला नाही…”

नैसर्गिक गोडी असल्यामुळे मध साखरेपेक्षा जास्त चांगला मानला जातो. आयुर्वेदात मधाचे अनेक फायदे सांगण्यात आलेत. लहान मुलांना उचकी लागली की मध पाण्यात घालून द्या, रोगप्रतिकारशक्तीसाठी मुलांना मध चाटा, गुटी द्या, अशा आजीच्या बटव्यातील अनेक गोष्टी वंशपरंपरागत आपण ऐकल्या आहेत. पण काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूरने वर्षापेक्षा लहान मुलांना मध देऊ नये, असं मत व्यक्त केलं.

सोशल मीडियावर व्हायर झालेल्या व्हिडीयोत सोनम म्हणते, “मी जी पुस्तकं वाचली आहेत. त्यानुसार पहिल्या वर्षापर्यंत मुलांना मध देऊ नये. यामुळे बोट्युलिझम होतं. मधामध्ये एक विशिष्ठ प्रकारचा बॅक्टेरिया (जीवाणू) असतो. त्यामुळे मुलं आजारी पडू शकतात.”

सोशल मीडियावर सोनम कपूरचा हा व्हिडीयो अनेकवेळा शेअर आणि रिशेअर करण्यात आलाय. सोनमच्या वक्तव्यावर अनेकांनी आपलं मत व्यक्त केलंय.

“माझा भटजींसोबत वाद झाला. मी त्यांना म्हटलं, मी मुलाला सफरचंदाची प्यूरी देईन. तुम्हाला आवडेल किंवा आवडणार नाही. पण, पहिलं अन्न म्हणून मी हेच देईन,” सोनम एका मुलाखती दरम्यान पुढे म्हणाली.

भारतात वर्षाखालील वयाच्या मुलांना अन्नप्राशन विधीदरम्यान मध चाटण्याची कित्येत वर्षापासूनची परंपरा आहे. आपल्यापैकी अनेकांना लहान असताना आजी, आई किंवा घरातील मोठ्यांनी मध चाटवला असेलच. याच परंपरेवर सोनमने आपलं मत व्यक्त केलंय.

सोनम पुढे म्हणाली, “आपल्या जुन्या परंपरेनुसार आपण अनेक गोष्टी करतो. बहुदा त्या वेगळ्या असतील. या आधी अनेक आयांनी आपल्या मुलांना मध दिला असेल. त्यांची मुलं चांगली आहेत. पण मी जरा जास्त काळजी घेतली.”

सोनमच्या यात वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेतला.

बोट्युलिझम म्हणजे काय?

बोट्युलिझम बॅक्टेरिया किंवा जीवाणूपासून होणारा एक आजार आहे. अमेरिकेची सर्वोच्य आरोग्य संस्था Center for Disease Control and Prevention (CDC) च्या माहितीनुसार,

“बोट्युलिझम हा एक दुर्मिळ पण गंभीर आजार आहे. यात टॉक्सिनमुळे शरीराच्या चेतनाप्रणालीवर (Nerves) आघात होतो. श्वास घेण्यात अडथळा, स्नायूचा पॅरलेसिस किंवा मृत्यू देखील होऊ शकतो.”

हे टॉक्सिन Clostridium botulinum and sometimes Clostridium butyricum and Clostridium baratii या बॅक्टेरियापासून बनतात. हा जीवाणू हे टॉक्सिन अन्न, जखम किंवा अगदी कमी वयाच्या मुलांच्या आतड्यात तयार करतो, CDC याबाबत माहिती देताना पुढे म्हटलंय.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार हे टॉक्सिन तयार करणारा बॅक्टेरिया विविध ठिकाणी आढळून येतो.

CDC च्या माहितीनुसार, हे जीवाणू स्पोअर तयार करतात. हे आवरण जीवाणूला त्या वातावरणात जगण्यासाठी मदत करतं. या स्पोअर्समुळे लोक सहजा आजारी पडत नाहीत. पण, शरीरात हे स्पोअर वाढले तर मात्र एक जीवघेणं टॉक्सिन तयार होतं.

हे स्पोअर कोणत्या परिस्थितीत तयार होतात,

कमी ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन उपलब्ध नसेल तर

कमी पित्त

कमी साखर

कमी मीठ

काही विशिष्ठ वातावरण असेल तर

तर जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, क्लॉस्ट्रीडियम बोट्युलिझम (Clostridium botulinum) हा जीवाणू कमी ऑक्सिजन असलेल्या वातावरणात खतरनाक टॉक्सिन तयार करतो. बोट्युलिझम टॉक्सिन खूप धोकादायक आहेत.

तज्ज्ञांच्या मते, ऑक्सिजन नसलेल्या ठिकाणी याचा वाढ होत असल्यामुळे कॅन मधील खाद्यपदार्थात हा जीवाणू मोठ्या संख्येने वाढतो.

मधामुळे बोट्युलिझमचा धोका आहे?

मुलांना काय द्यावं, काय देऊ नये. कोणते पौष्टीक पदार्थ द्यावे. याबाबत कुटुंबातील सदस्य आणि डॉक्टर्स यांच्यात कायम वाद ठरलेलाच. त्यात लहान मुलांना मध द्यावा की देऊ नये? हा एक वादाचा मुद्दा नक्कीच.

जागतिक आरोग्य संघटना आणि CDC या दोन्ही संस्थांनी कुटुंबीय आणि डॉक्टरांना एका वर्षाखालील वयाच्या मुलांना मध देण्यात येऊ नये अशी सावधगिरीची सूचना केलीये.

CDC च्या माहितीनुसार, “मधामध्ये बोट्युलिझमला कारणीभूत बॅक्टेरिया असतो. त्यामुळे एका वर्षाखालील वयाच्या मुलांना मध देऊ नये. एका वर्षापेक्षा जास्त वयाची मुलं आणि त्यापेक्षा मोठ्यांना मधापासून धोका नाही.”

पण आपल्याकडे वर्षोनवर्ष मधात औषधी गूणधर्म असल्यामुळे, मध लहान मुलांना देण्यात येतो. भारतात अन्नप्राशन पूजेदरम्यान मध देण्याची परंपरा आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतात उशीराने स्तनपान देणं आणि मुलांना मध किंवा बकरीचं दूध देण्यासारख्या गोष्टी सर्रास पहायला मिळतात.

भारतातील बालरोगतज्ज्ञांची संस्था, Indian Academy of Paediatrics ने सुद्धा लहान मुलांना मध देऊ नये अशी सूचना केलीये. नवजात मुलांना इतर कोणताही द्रव पदार्थ किंवा मधाची घुटी, पावडर दूध किंवा सारखेचं पाणी देउ नये. या गोष्टी मुलांसाठी हानीकारक आहेत.

बोट्युलिझमची लक्षणं काय?

बोट्युलिझमची लक्षणं ही बॅक्टेरियामुळे नाहीत. तर, या बॅक्टेरियापासून तयार होणाखऱ्या टॉक्सिनमुळे दिसून येतात. या जीवाणूचा शरीरात शिरकाव झाल्यापासून 12-36 तासात लक्षणं दिसू लागतात.

बद्धकोष्ठता

श्वास घेण्यास निर्माण होणारा अडथळा

पापण्यात उतरलेल्या होणे (Drooping eyelids)

चेहऱ्यावर कमी हावभाव (Face showing less expression than usual)

बुबुळांची प्रकाशामुळे होणारी हालचाल मंदावणे (Pupils that are slow to react to light)

((Source-The CDC)) 

बोट्युलिझमचे प्रकार कोणते?

बोट्युलिझमच्ये प्रामुख्याने पाच प्रकार आहेत. लहान मुलांना होणारं, दूषित अन्नातून होणारे, Inhalation Botulism, नशा केल्यामुळे होणारं आणि botox. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार,

Infant Botulism: 

सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांना होणारा आजार. लहान मुलांच्या पोटात C. botulinum चे स्पोअर गेल्यानंतर बॅक्टेरिया तयार होतात. मोठ्या संख्येने तयार झालेले बॅक्टेरिया पोटात जमा होतात आणि टॉक्सिन तयार करतात. यामुळे बद्धकोष्ठता, भूक न लागणे, थकवा याचा त्रास होतो. लहान मुलांना होणाऱ्या या आजारासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. स्पोअरमुळे दूषित झालेल्या मधामुळे अनेकांना हा आजार होतो.

Wound Botulism

हा आजार दुर्मिळ आहे. ज्या वेळेस हे स्पोअर जखमेतून आत शिरकाव करतात आणि वाढतात. त्यावेळी हा आजार होतो. याची लक्षणं दूषित अन्नातूमुळे झालेल्या आजारासारखीच असतात. पण लक्षणं दिसण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.

Foodborne Botulism

अन्न खाण्यापूर्वी त्यात C. botulinum ची वाढ झाली असेल आणि टॉक्सिन तयार झाले असतील तर, अशा अन्नाचं सेवन केल्यामुळे आजारल होऊ शकतो. C. botulinum चे स्पोअर माती, नदी आणि समुद्रातील पाण्यात असू शकतात.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कॅन केलेले पदार्थ किंवा कमी acid (आम्ल) असलेल्या साठवलेल्या भाज्या उदाहरणार्थ, हिरव्या शेंगा, पालक, बीट यात हे टॉक्सिन तयार होण्याची शक्यता असते. कॅन करण्यात आलेल्या माशांतही हे आढळून येतं.

निदान आणि उपचार

प्रयोगशाळेतील तपासणी नंतर याचं योग्य निदान केलं जातं. तात्काळ किंवा योग्यवेळेत एंटीटॉक्सिन मिळाले तर रुग्णांचा जीव वाचू शकतो.

सोनम कपूरच्या वक्तव्यावर टिका झाली असली. तरी, डॉक्टरांनी सोनमचं मत योग्य असल्याचं म्हटलंय.

हेपेटॉलॉजिस्ट आणि संशोधक डॉ. Cyriac Abby Philips सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहीतात, नवजात बालकांना मध देणं त्यांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. यामुळे Infantile botulism होण्याची शक्यता असते. जे जीवघेणं आहे.

((The information and quote in this article are sourced from WHO, CDC, Indian Academy of Paediatrics, Social Media X))

ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा.

Leave a comment