Fig: रोज अंजीर खाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे 

तुम्हाला सर्वात जास्त त्रास कशाचा होतो? काही म्हणतील पोटाचा- सारखं अपचन होतं. काहींना कॉलेस्ट्रॉलचा, सांधेदुखी खूप कॉमन आहे, काही सांगतील हार्टचा त्रास. बदललेल्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. जगभरात 90 टक्के हेल्थ इश्यूज याच आजारांमुळे होतात. आजच्या व्हिडीयोत आपण एका ड्रायफ्रूटची माहिती घेणार आहोत. या ड्रायफ्रूटची खासीयत अशी की, यात भरपूर पौष्टीक घटक आहेत. जे आर्थरायटीस, उच्चरक्तदाब, डायजेशन प्रॉब्लेम, शूगर बॅलन्स करण्यासाठी, हार्ट प्रॉब्लेम या सर्व प्रकरणात खूप फायदे देतात. चला तर मग या ड्रायफ्रुटबाबत जास्त माहिती घेऊया. याचं नाव आहे अंजीर….

केळं, सफरचंदासारखं अंजीर डाएटमध्ये सहसा दिसून येत नाही. ओलं अंजीर बाहेरून दिसायला जांभळं किंवा काहीवेळा हिरवं असतं. अंजीरला इंग्रजीमध्ये फिग…FIG  म्हणतात. आखाती देशात हे मोठ्याप्रमाणावर होतं. अंजीर आपण ड्राय फॉर्ममध्ये खातो पण ओलं अंजीर खाण्यासाठी खूप चांगलं आहे. यात लाखो छोट्या-छोट्या बिया असतात. अंजीरमध्ये बहुतांश व्हिटॅमिन, मिनरल्स आणि शरीरासाठी अत्यंत उपयुक्त फायबर असतं. 

Improve Digestion

आयुर्वेदीक औषधांमध्ये पोटाच्या विकारांवर उपाय म्हणून प्राचीन काळापासून अंजीरचा वापर होतो. फायबर-रिच गोष्टी डायजेशन किंवा पचनासाठी खूप चांगल्या असतात. अंजीर एक फायबर-रिच फळ आणि ड्रायफ्रूट आहे. क्लिव्हलॅंड क्लिनिकच्या माहितीनुसार, अंजीरमध्ये प्रि-बायोटिक न्यूट्रीअंट असतात. हे पौष्टीक घटक गट किंवा आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांसाठी खूप फायदेशीर असतात. गटहेल्थ चांगली असेल कर शरीरात इन्फमेशन होत नाही आणि रोगप्रतिकारशक्तीचं कार्य चांगलं रहाण्यास मदत होते. पोट साफ होण्यात अडथळा होत असेल तर अंजीर एक उत्तम उपाय आहे. ज्या व्यक्तींना इरिटेबल बॉवेल सिंन्ड्रोम आणि कॉन्स्टिपेशन आहे त्यांच्यासाठी अंजीर खूप फायदेशीर आहे. सायन्स डायरेक्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एका संशोधनात इरिटेबल बॉवेल सिंन्ड्रोम असलेल्या150 लोकांना 45 ग्रॅम अंजीर दिवसातून होन वेळा दिलं. या रुग्णांमध्ये पोट फुगण्याची आणि बॉवेल पेनची समस्या कमी झाल्याचं संशोधकांना आढळून आलं. अंजीर आतड्यात जाऊन स्टूलला सॉफ्ट करतं ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. खूप जास्त कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर दुृधात अंजीर टाकून रात्री झोपताना खाल्ल तर नक्की फायदा होईल. अंजीरचा लिव्हर म्हणजेच यकृतावरही चांगला फायदा होतो. 

रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत रोज अंजीर खाल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात रहाण्यास मदत होते. Diabetes Research and Clinical Practices मध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार, टाइप-

1 डायबिटीसच्या रुग्णांमध्ये अंजीरच्या पानांचा चहा प्यायल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्याचं आढळून आलं. ज्या महिन्यात त्यांनी हा चहा घेतला. त्या महिन्यात इन्सुलिनचा वापर 12 टक्क्यांनी कमी झाला. अंजीर टाइप- 2 प्रकारचा मधुमेह असलेल्यांसाठी खूप फायदेशीदर आहे.  क्लिव्हलॅंड क्लिनिकच्या माहितीनुसार, अंजीरमध्ये खूप चांगले अॅन्टीऑक्सिडंट असतात. कॅरोटेनोइड्स आणि पॉलिफेनॉलसारखे अटी इन्फ्लमेटरी केमिकल्स असतात. अंजीर डायबिटीसमुळे शरीरात होणाऱ्या सर्व इन्फ्लमेशनला बरं करू शकत नाहीत. पण यातील पौष्टीक घटक मधुमेहामुळे शरीरात होणारी काही प्रमाणात कमी करण्यात मदत होते. 

हृदयाचं आरोग्य चांगलं रहातं 

अंजीर उच्चरक्तदाब आणि कॉलेस्ट्रॉल कमी करतं. हायपरटेन्शनमुळे हृदयरोग किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. हृदयरोगाचं एक प्रमुख कारण म्हणजे शरीरातील पोटॅशिअमची कमतरता आणि खूप जास्त प्रमामात सोडियम खाणं. वेबएमडीच्या माहितीनुसार, अंजीरमध्ये खूप पोटॅशिअम आहे. ज्यामुळे शरीरातील पोटॅशिअमची कमतरता भरून निघण्यास मदत होते.  अंजीरमधील फायबर शरीरातील अतिरिक्त सोडियम शरीराबाहेर फेकण्यास मदत करतं. क्लिव्हलॅंड क्लिनिकच्या माहितीनुसार, प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या काही संशोधनात आढळून आलं की अंजीरमुळे चांगलं कॉलेस्टॉल वाढण्यास मदत होते. तर रोज अंजीऱ खाल्यामुळे बॅड कॉलेस्टॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होतात. त्यामुळे आपण असं म्हणू शकतं की अंजीर हार्ट हेल्थ प्रोटेक्ट करण्यासाठी खूप चांगलं आहे. 

अंजीर हाडांसाठी चांगलं 

अंजीर कॅल्शिअम आणि पोटॅशिअमचा खूप चांगला सोर्स आहे. वेबएमडीच्या माहितीनुसार, ही मिनरल्स हाडं मजबूत होण्यासाठी फायदेशीर आहेत. यामुळे ऑस्टेओआर्थरायटिससारखे आजारावर प्रतिबंध करण्यास मदत होते. संशोधनात आढळून आलंय की पोटॅशिअम-रिच गोष्टी खाल्यामुळे हाडं चांगली रहातात. त्यामुळे हाडं कमकुवत असलेल्या लोकांनी अंजीर रोज खाल्ल पाहिजे. 

त्वचा आणि केसांसाठी अंजीरचे फायदे 

त्वचा कोरडी पडत असेल, खाज सुटत असेल किंवा एक्झिमाचा त्रास असेल तर अंजीर खाणं खूप चांगलं आहे. अंजीरमध्ये आयर्न असतं. आयर्न केसांसाठी खूप चांगलंं आहे. त्यामुळे अंजीर खाल्याने त्वचा आणि केस चांगले रहाण्यास मदत होते. 

Reproductive Health 

प्रजनन क्षमता वाढण्यासाठी अंजीरचा फायदा होतो. पुरुषांमध्ये स्मर्म काउंट आणि मोटिलिटी वाढण्यास मदत होते. यामुळे पुरुषांमध्ये फर्टिलिटी वाढते. मेडिकल न्यूज टूडेच्या माहितीनुसार, 2022 मध्ये झालेल्या संशोधनात आढळून आलं की अंजीरच्या पानांच्या डाएट सप्लिमेंटमध्ये वापर केल्यामुळे लैगिक कार्य सुधारलं. पण माणसांवर याबाबत पुढील संशोधन गरजेचं आहे. 

दिवसातून एक-दोन अंजीर आपण नक्की खाऊ शकतो. सकाळ, दुपार किंवा रात्र कधीही अंजीर खाल्लं तरी चालू शकतं. पण कॉन्स्टिपेशनचा त्रास असलेल्यांनी अंजीर रात्री झोपेच्या आधी खावं. अंजीर गरम मानलं जातं. त्यामुळे उन्हाळ्यात अंजीर पाण्यात भिजवून खावं. त्यामुळे अंजीर खाल्यानंतर पाणीदेखील पिऊ शकतो. 

क्लिव्हलॅंड क्लिनिकच्या माहितीनुसार, अंजीर रोज खाणं नक्कीच चांगलं आहे. पण, एकाच दिवशी खूप जास्त प्रमाणात अंजीर खाल्यामुळे पोटात दुखु शकतं किंवा डायरिया होण्याची शक्यता असते. 

Image Source: Pexeles

Information Source:

((https://www.webmd.com/diet/health-benefits-figs))

((https://health.clevelandclinic.org/benefits-of-figs))

((https://www.diabetesresearchclinicalpractice.com/article/S0168-8227(97)00112-5/abstract))

((https://www.medicalnewstoday.com/articles/327207#risks))

Leave a comment