हेडफोन Full Volume मध्ये वापरता? 🎧 कानाचं नुकसान कसं होतं | Hearing Loss

ट्रेन, बस, चालताना, जॉगिंग करताना, कॅफेमध्ये, जिममध्ये…पहावं तिकडे..लोकांच्या कानात हल्ली हेडफोन असतो. आपल्याच दुनियेत मग्न. आवाज कमी ऐकू येत असेल तर मग फोनचं volume बटन पार 8-10 वेळा जोरजोरात प्रेस करतात. volume एका लिमिटनंतर वाढत नाही…पण कान मात्र कामातून जातो..माझ्या अनुभवावरून सांगतोय. मी हेच करायचो..पण याचा कधी विचार केलाय..की फूल volume मध्ये हेडफोनवर बोलताना किंवा गाणी तुमच्या कानात काय सुरू असतं?  चला कानात काय घडतं हे कानाच्या आत जाऊन पाहूया..

ऐकताना कानात काय होत असतं? 

हा व्हिडीयो फार महत्त्वाचा आहे..बरोबर..पण ऐकण्यासाठी volume बटन पार तुटेपर्यंत प्रेस करू नका..मध्यम आवाजात हा व्हिडीयो पूर्ण पहा.मोठ्या आवाजात हेडफोनवर ऐकताना कानात नक्की काय होत असतं? हे पहाण्यासाठी मी AI च्या मदतीने कानाच्या आतील भागाचं व्हिडीयो मॉडेल बनवण्याचा प्रयत्न केला. चला कानातच जाऊन पाहूया आत काय होतंय ते? 

American Speech-Language Hearing Association च्या माहितीनुसार, 

कानात आवाज साउंड व्हेवच्या मदतीने पोहोचतो. आवाज मोठा असेल तर या व्हेव मोठ्या असतात. 

साउंड व्हेव कानातून आत जातात ज्यामुळे पडदा व्हायब्रेट होतो.

कानाच्या मध्य भागातील तीन हाडं आवाजामुळे हलतात आणि व्हायब्रेशन मोठं होतं. 

ही हाडं आवाज कानाच्या आतल्या भागात पोहोचवतात. याला वैद्यकीय भाषेत cochlea म्हणतात. यात द्रव पदार्थ असतो आणि त्याच्याबाजूला छोेटे हेअर सेल्स असतात. 

व्हायब्रेशनमुळे द्रव पदार्थ आणि हेअर सेल्स हलतात. हेअर सेल्स व्हायब्रेशनचं इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये रूपांतर करतात आणि मेंदूकडे पाठवतात. 

फक्त हेल्दी किंवा सुस्थितीत असलेले हेअर सेल्स मेंदूकडे सिग्नल पाठवू शकतात. 

((https://www.asha.org/public/hearing/loud-noise-dangers/#:~:text=If%20sounds%20are%20loud%2C%20they,pitched%20sounds%20to%20the%20brain.))

cochlea कानातील खूप संवेदनशील भाग आहे. क्लिव्हलॅंड क्लिनिकच्या माहितीनुसार, या स्पायरल आकाराच्या कॅव्हिटीत दोन चेंबरमध्ये द्रव पदार्थ असतो. त्यालाच हे अत्यंत छोेटे हेअर सेल्स असतात. 

((https://health.clevelandclinic.org/how-to-rock-out-with-ear-buds-or-headphones-without-damaging-your-hearing))

मोठ्या आवाजात ऐकल्यामुळे कानात काय होतं?

दिर्घकाळ खूप मोठ्या आवाजात ऐकलं तर कानाला इजा होते आणि ऐकू येण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. पण मोठ्या आवाजात ऐकताना कानात नक्की होतं काय? तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कानातील हेअर सेल्स मोठ्या आवाजाला खूप सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील असतात. आवाज मोठा असेल तर कानातील द्रव पदार्थ जास्त हलतो आणि त्यामुळे हेअर सेल्सना नुकसान होतं.   

American Speech-Language Hearing Association च्या माहितीनुसार, 

मोठ्या आवाजामुळे डॅमेज किंवा खराब झालेले हेअर सेल्स मेंदूला योग्य प्रकारे सिग्नल पोहोचवू शकत नाहीत. 

खूप मोठ्या आवाजामुळे मेंदूला हाय-पीच साउंड पोहोचवणाऱ्या हेअर सेल्सना पहिल्यांदा इजा पोहोचते. 

फटाके, स्फोट किंवा रॉक कॉन्सर्टच्या आवाजामुळेही कानातील हेअर सेल्सना इजा होऊ शकते. 

((https://www.asha.org/public/hearing/loud-noise-dangers/#:~:text=If%20sounds%20are%20loud%2C%20they,pitched%20sounds%20to%20the%20brain.))

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दिर्घकाळ मोठ्या आवाजामुळे हेअर सेल्सना मोठ्या प्रमाणात इजा होते. ज्यामुळे ऐकू येणं कमी होऊ शकतं किंवा हिअरिंग लॉस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मग हेडफोनवर गाणी किती आवाजात ऐकावी? 

जागतिक आरोग्य संघटनेने मोठ्या आवाजाचा कानावर परिणाम होऊ नये यासाठी किती आवाजात गाणी ऐकावी याची माहिती दिलीये. 

WHO च्या सांगण्यानुसार, 

ऐकताना फोनचा साउंड 60 टक्क्यांपेक्षा कमी ठेवा 

कानात फिट होणारे आणि noise-cancelling हेडफोन वापरा. यामुळे फोनचा साउंड वाढवण्याची गरज पडणार नाही. मोठ्या आवाजात गाणी जास्तवेळ ऐकू नका. 

((https://x.com/who/status/1849741484414718405?s=12))

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 

80dB पर्यंत आवाज आठवड्याला 40 hours सेफ आहे.
उदाहरणार्थ डोअरबेल 


85dB पर्यंत आवाज आठवड्याला 12h 30 तास. उदाहरणार्थ खूप ट्रॅफिकचा आवाज 

90db पर्यंत आवाज आठवड्याला 4 तास
उदाहरणार्थ खूप मोठ्याने बोलण्याचा 

95db पर्यंतचा आवाज आठवड्याला 1.15 तास 
उदाहरणार्थ मोटरसायकल  

100db पर्यंत आठवड्याला 20 मिनिटं 
((https://www.who.int/news-room/questions-and-answers/item/deafness-and-hearing-loss-safe-listening)
हेडफोमुळे हिअरिंग लॉस होतो? मिळालेल्या माहितीनुसार, 6-19 वर्षवयोगटातील प्रत्येक 8 मुलांमागे एका मुलाला ऐकू येण्याचा त्रास आहे. या त्रासाचं प्रमुख कारण इअरबड्स किंवा हेडफोन आहे. याचं कारण जगभरातील लाखो मुलं तासंतास हेडफोन लाऊन मोबाईलकिंवा लॅपटॉपवर असतात. मोठ्या आवाजामुळे फक्त कानाला त्रास होतो असं नाही. तुम्ही चिडचिडे बनता किंवाखूप लवकर थकवा येतो. त्याचसोबत हाय ब्लडप्रेशर, हृदयाचे ठोके वाढतात, झोपेची समस्या सुरू होते, क्लिव्हलॅंड क्लिनिकच्या माहितीनुसार, दिर्घकाळ मोठ्या आवाजामुळे कानाला कायमची हानी होते. कानांवर जास्त आघात होणाऱ्यांचे कान 50% लवकर खराब होतात. असं समजा, तुम्ही पन्नाशीला पोहोचेपर्यंततुमचे कान एका 80 वर्षाच्या व्यक्तीसारखे होऊ शकतात. तर तज्ज्ञ सांगतात, मोठ्या volume मध्ये इअरबड्स वापरले तर 30 मिनिटातच कानाला इजा होण्यास सुरूवात होते. जगभरात १२-३५ वयोगटातील 1 billion लोकांना मोठ्या आवाजात गाणी खूप वर्ष ऐकल्यामुळे हिअरिंग लॉस होण्याचा धोका आहे. 

शाळेतून घरी आल्यानंतर बहुतांश Gen Z जनरेशनचा लूक असा असतो. कानात सतत हेडफोन..मोठ्या आवाजात सुरू गाणी..कितीही हाका मारल्या तरी कानावर शब्द पडत नाही. आपणंही बऱ्याचवेळा असं करतो. त्यामुळे वेळीच सावध होणं गरजेचं आहे. हा व्हिडीयो कसा वाटला हे नक्की कळवा. 

Leave a comment