या लेखात आपण अशा गोष्टीची माहिती जाणून घेणार आहोत. जी अत्यंत सहज उपलब्ध आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हळद…आजीच्या बटव्यातील हळदीचे फायदे तुम्हाला माहित असतील. आयुर्वेदीक औषधातही हळदीचा वापर केला जातो. आज मी तुम्हाला हळदीचे 10 सायंटिफिक फायदे सांगणार आहे. हळद गुणकारी आहे हे सर्वांना माहितेय. तुम्हाला माहित नसेल पण हळदीचं पाणी रोज प्यायल्याने खूप फायदा होतो.
Reduces Inflammation
हळदीचा पहिला सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे हळद Inflamation किंवा सूज कमी करण्यासाठी खूर फादेशीर आहे. आजच्या हेकटिक वातावरणात शरीरात सूज येणं खूप मोठी समस्या आहे. जॉइंटमध्ये Inflammation झालं तर आर्थरायटीस होण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यात Inflammation मुळे ब्लॉकेजचा धोका वाढतो. हृदयासंबंधीचे आजार, उच्चरक्तदाबाचा धोका होतो. जॉन हॉपकिन्स मेडिसिनच्या माहितीनुसार, हळदीत कर्क्यूमिन नावाचं नॅचरल पॉलीफेनॉल आहे. ज्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे जॉइंट पेन, दुखापत झाल्यास दाह कमी होतो. कॅन्सर, अस्थमा, अॅलर्जी, मधुमेह, लठ्ठपणा यांसारख्या आजारात शरीरातील Inflamation कारणीभूत असतं.
Antioxidant Properties
हळदीतील कर्क्यूमिन अँटीऑक्सिडंट सुद्धा आहे. हळदीत फायटोन्युट्रिएंट्स शरीराचं प्रदूषण, सूर्यप्रकाश यांसारख्या फ्री-रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. कर्क्यूमिन आपल्याभोवती एक प्रोटेक्टिव्ह शिल्ड तयार करतं आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतं. यामुळे ेस्कीन चांगली होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
हळद रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. शरीराचं डिफेंन्स मेकॅनिझम मजबूत करण्यास मदत करते. चांगली रोगप्रतिकारशक्ती बॅक्टेरिया, व्हायरस संसर्गापासून प्रोटेक्ट करते. हळदीतील कर्क्यूमिन नावाचा घटक इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी फायदेशीर आहे. काही संशोधनात समोर आलंय की हळदीच्या सेवनामुळे इम्युन सेल्सची अॅक्टिव्हिटी वाढते.
आर्थरायटीस
जगभरात २५० मिलियन लोकांना ऑस्टिओआर्थरायटिसची समस्या आहे. हळदीतील कर्क्यूमिन आर्थरायटीसवर खूप फायदेशीर आहे. याबाबत काही अभ्यास झाले. रुग्णांना औषधं आणि काहींना कर्क्यूमिन देण्यात आलं. संशोधकांना आढळलं की, कर्क्यूमिन ऑस्टिओआर्थरायटिस रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. जॉन हॉपकिन्स मेडिसिनच्या माहितीनुसार काही संशोधनात ऑस्टिओआर्थरायटिस रुग्णांनी जेवणात हळद असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यावर सांधेदुखी कमी झाल्याचे सांगितलं. म्हणूनच, हळद अर्क आणि कर्क्युमिन यांची शिफारस सांधेदुखीच्या विशेषतः ऑस्टिओआर्थरायटिसच्या लक्षणांना कमी करण्यासाठी केली जाऊ शकते असं संशोधक म्हणतात.
पण पुढचा सायंटिफिक फायदा ऐकण्याअगोदार हा व्हिडीयो जरूर लाइक आणि चॅनल सब्क्राइब करा. असे व्हिडीयो बनवण्यासाठी खूप रिसर्च करावा लागतो.
Supports digestive health
हळदीचा पाचवा फायदा म्हणजे…पचनसंस्थेला मिळणारी मदत. हळद पचनक्रिया सुधारण्यात मदत करते. हार्वर्ड हेल्थच्या माहितीनुसार, प्राचीन आयुर्वेदीक आणि चीनी औषधांमध्ये हळद अनेक प्रकारचे digestive disorder म्हणजे पचनक्रियेतील आजारांविरोधात उपाय म्हणून वापरली जाते. डायजेशन चांगलं असेल तर आजार होत नाहीत आणि आरोग्य चांगलं रहातं. पण काहीवेळा अॅसिडीटी आणि पोट फुगल्यासारखं होतं. अशावेळी हळद सूज कमी करण्यात मदत करते. कॅनेडियन डायजेस्टिव्ह हेल्थ फाउंडेशनच्या माहितीनुसार, हळदीमध्ये आढळणारं कर्क्युमिन आतड्यांतील मायक्रोबायोटासोबत म्हणजे (सूक्ष्मजीवसमूहांसोबत) कार्य करतं. मायक्रोबायोटामध्ये असंतुलन झाल्यास इरिटेबल बॉवेल सिंन्ड्रोम, कोलन कॅन्सर, लठ्ठपणा, मधुमेह आणि अॅलर्जी यांसारखे आजार होण्याचा धोका असतो. हळद हा मायक्रोबायोटा मजबूत करण्यात मदत करते.
कॅन्सर आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो?
वेबएडीच्या माहितीनुसार, हळदीच्या अँटी-कॅन्सर प्रोपर्टिजबाबत संशोधक अजूनही जास्त अभ्यास करत आहेत आणि माणसांमध्ये अँटी-कॅन्सर परिणामाबाबत संशोधन सुरू आहे. पण प्राण्यांवर करण्यात आलेल्या संशोधनात हळद कोलोन कॅन्सर, पोट आणि त्वचेच्या कॅन्सरविरोधात संरक्षण देते असं आढळून आलंय. हळद हृदयरोगाचा धोका कमी करते. २०१२ मध्ये १२१ बायपास सर्जरी झालेल्या लोकांवर एक संशोधन करण्यात आलं. यातील ज्या लोकांना सर्जरीच्या आधी आणि नंतर कर्क्युमिन दिलं, त्यांना रुग्णालयात हार्ट अटॅक येण्याचा धोका ६५ टक्क्यांनी कमी झाल्याचं दिसून आलं. हळद नसांच्या आतील आवरण चांगलं ठेवण्यात मदत करते.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत
मेडिकल न्यूज टूडेच्या माहितीनुसार, साल 2017 मध्ये हळदीचा कोलेस्ट्रॉलवर काय फायदा होतो यावर संशोधन करण्यात आलं होतं. संशोधकांना असं आढळून आलं, हळदीचे रक्ताच्या लिपिड लेव्हलवर चांगला परिणाम होतो. संशोधकांच्या माहितीनुसार, हळद आणि कर्क्युमिनम सिरम LDL आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होतात. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होण्यात मदत मिळू शकते.
त्वचा चांगली होते
चेहऱ्याला आपण हळदीचा लेप लावतो. अनेक फेस क्रिममध्ये हळद असते. हळदीत अंटी बॅक्टेरिअल प्रोपर्टीज आहेत. त्यामुळे चेहऱ्यावर इन्फेक्शन होण्यापासून संरक्षण मिळतं. हळदीचं पाणी रोज प्यायल्याने स्किन टवटवीत रहाण्यास मदत होते.
Supports liver health
यकृत किंवा लिव्हर शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. याचा डिटॉक्सिफिकेशन, अन्नाचं पचन आणि मेटॅबोलिझममध्ये अत्यंत महत्त्वा रोल आहे. सायन्स डायरेक्टमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार, हळद आणि कर्क्युमिनचा लिव्हरच्या काही प्रोफाइलवर अत्यंत चांगला प्रभाव पडतो. लाइफस्टाइल, दारूचं अतिसेवन आणि प्रदुषणामुळे लिव्हरवर परिणाम होतो. हळद लिव्हर सेल्सला प्रोटेक्ट करण्यासाठी मदत करते. ज्यामुळे लिव्हर खराब होण्याचा धोका कमी होण्याची शक्यता असते.
मेंदूचं कार्य सुधारतं
क्लिव्हलॅंड क्लिनिकच्या माहितीनुसार, हळदीमुळे मेंदूचं कार्य सुधारण्यात मदत होते. 2018 च्या संशोधनात असं आढळून आलंय की, डिमेंशियाचा त्रास नसलेल्यांना ९० ग्रॅम कर्क्युमिन दिवसातून दोन वेळा १८ महिने दिल्यानंतर त्यांच्या मेमरीत वाढ झाल्याचं दिसून आलं.
लठ्ठपणा
ओबेसिटी किंवा लठ्ठपणा Inflamation शी संबंधित आहे. हळदीतील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म तुम्हाला बॅलन्स वेट ठेवण्यासाठी मदत करू शकतात. पण म्हणून फक्त हळदीचं पाणी पिउन किंवा हळद जास्त खाऊन चालणार नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला चांगलं डाएट आणि व्यायाम करावा लागेल.
मनिपाल हॉस्पिलटच्या माहितीनुसार हळदीचं पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. हळदीचं पाणी सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना प्यावं. हळद पाण्यात टाकून पाणी उकळून घ्यावं त्यानंतर गाळून झाल्यानंतर थोडी काळीमीरी टाकावी. हळद पावडर किंवा कच्ची हळद कुटून तुम्ही वापरू शकता.
हळदीचं पाणी कोणी पिऊ नये?
हे झाले हळदीचं पाणी पिण्याचे फायदे. पण काही लोकांनी हळदीचं पाणी अजिबात पिऊ नये. वेब एडीच्या माहितीनुसार, गर्भवती महिला, ब्रेस्ट फिडींग करण्याऱ्या महिला, गॉलब्रॅडर म्हणजे पित्ताशयाचा त्रास असेल तर, रक्त पातळ होण्याची औषध घेत असाल तर आणि लिव्हरचा आजार असलेल्यांनी हळदीचं पाणी अजिबात पिऊ नये. जेफर्सन हेल्थचे डॉ. दे मारझियो सांगतात, हेपॅटोसेल्युलर लिव्हरचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये ज्यात लिव्हरच्या सेल्सना सूज येते याला हळद कारणीभूत असलेल्याचा पॅटर्न आम्हाला ंआढळून आला.
हळद गुणकारी आहे. हळदीचं पाणी रोज पिण्याचे खूप फायदे आहेत. या व्हिडीयोच्या माध्यमातून हळदीचे सायंटिफीक फायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडीयो आवडला असेल तर नक्की शेअर करा.

Image Source: Freepick
Information Source:
((https://www.medicalnewstoday.com/articles/turmeric-cholesterol#effect-on-cholesterol))
(https://cdhf.ca/en/benefits-of-turmeric/))
((https://www.health.harvard.edu/staying-healthy/turmeric-benefits-a-look-at-the-evidence))
((https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC5664031/))
((https://www.webmd.com/depression/turmeric-depression))
((https://health.clevelandclinic.org/turmeric-health-benefits))
((https://www.webmd.com/vitamins/ai/ingredientmono-662/turmeric)