‘NEAT’ जिम न करता हेल्दी कराण्याचा मार्ग? 

फीट रहाण्यासाठी व्यायाम गरजेचा. पण कामाच्या व्यापात जमतंच असं नाही. शरीराची हालचाल झाली नाही की वजन वाढतं. तुम्हाला माहितेय, अशावेळी जिमला न जाता सुद्धा हेल्दी रहाण्याचा मार्ग आहे? हा मार्ग ‘NEAT’ पाळला पाहिजे. चला आजच्या व्हिडीओमध्ये ‘NEAT’ म्हणजे काय जाणून घेऊया.

‘NEAT’ म्हणजे non-exercise activity thermogenesis.. सोप्या शब्दात व्यायामाशिवाय दिवसभर केल्या जाणाऱ्या सर्व हालचालीतून बर्न होणाऱ्या कॅलरीज. उदाहरणार्थ- चालणं, घरकाम करणं, उभं रहाणं, जिने चढणं, दुकानात वस्तू खरेदी करताना होणारी हालचाल, जेवण बनवणं. आता पाहा- या गोष्टी म्हणजे व्यायाम नाही. पण आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत..बरोबर

क्लिव्हलॅंड क्लिनिकच्या माहितीनुसार,  ‘NEAT’ म्हणजे आपण करत असलेल्या गोष्टी ज्या व्यायाम नाहीत. पण तरी कॅलरी बर्न होण्यासाठी, आणि शरीराला चांगलं कार्यरत ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या क्रिया. सोप्या शब्दात ‘NEAT’ म्हणजे अशा क्रिया ज्यामुळे शरीराची हालचाल होते पण हार्टरेट खूप जास्त वाढत नाही. 

‘NEAT’ बाबत रिसर्च करताना मला कार्डिओलॉजिस्ट डॉ रविंद्र कुलकर्णी यांनी सोशल मीडिया ‘X’ वर दिलेली माहिती सापडली. ते म्हणतात, 

सतत बसून काम केल्यामुळे ‘NEAT’ शून्य होतो. 

‘NEAT’ वाढवणं म्हणजे काही सवयी बदलणं उदाहरणार्थ लिफ्टऐवजी जिना वापरणं, कॉल करताना उभं रहाणं. 

‘NEAT’ वाढल्यास इंसुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते, डायबिटीस आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो 

मेटॅबोलिझम active रहातं 

काम करताना 30-60 मिनटांनी काहीवेळ उठून चालणं हे ‘NEAT’ वाढवण्याचा सोपा उपाय आहे 

क्लिव्हलॅंड क्लिनिकच्या माहितीनुसार, ‘NEAT’ मुळे तुम्ही महिनाभरात काही 10 पाउंड वजन कमी करणार नाही. पण ‘NEAT’ चा एक संधी म्हणून विचार केला आणि छोटे बदल केले तर शरीराला याचा फायदा नक्की होईल. कारण ‘NEAT’ मुळे काही कॅलरी बर्न होतात आणि दिर्घकाळ केल्यास याचा फायदा मिळतो. 

 डॉ. कुलकर्णी पुढे लिहीतात, ‘NEAT’ sustainable weight loss चं scientific secret आहे. जिम शिवायही आरोग्य सुधारता येतं. तर एका संशोधनात आढळून आलं की NEAT हालचालींमुळे शरीराचे वजन आणि क्रियांच्या पातळीनुसार, बेसल मेटाबॉलिक रेटपेक्षा दररोज 2000 kcal पर्यंत अतिरिक्त खर्च होऊ शकतो. त्यामुळे जर तुमचं घरं नीट नसेल तर ‘NEAT’ मिवण्यासाठी ही एक opportuity आहे असा विचार करा. 

Source: Pexeles

Leave a comment