How Often Should You Shower? दररोज आंघोळ फायदेशीर की नुकसानकारक?

तुम्ही रोज आंघोळ करता? मग तुम्हाला सांगितलं की आठवड्यातून 2-3 वेळा आंघोळ केली तर शरीरासाठई चांगलं. तुमची पहिली प्रतिक्रिया असेल हा मूर्खपणाचं सांगतोय. पण, 100 सेकंदात तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय.

आंघोळीशिवाय दिवस सुरू झाल्यासारखं वाटत नाही. बरोबर..माझ्यासोबतही असं होतं. काही थंड तर काही कडक पाण्याने आंघोळ करतात. आंघोळ म्हणजे एक सोशल नॉर्म किंवा सवय आहे. आंघोळ करण्याची कॉमन कारणं म्हणजे – शरीरातून येणारा वास घालवण्यासाठी, सकाळी फ्रेश वाटण्यासाठी, झोप जाण्यासाठी, रोज सकाळी व्यायाम केला तर फ्रेश होण्यासाठी वगैरे. 

तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण रोज आंघोळ केल्यामुळे आरोग्यावर खासकरून त्वचेवर परिणाम होतो. Harvard Medical School च्या वेबसाइटवर डॉ. रॉबर्ट शमेरलिंग यांनी आंघोळीच्या परिणामांची माहिती दिलीये. ते लिहीतात, नॉर्मल हेल्दी त्वचेवर ऑइलचा लेअर, चांगले बॅक्टेरिया आणि इतर मायक्रोऑर्गॅनिझम्स असतात. आंघोळ आणि स्क्रब केल्यामुळे हे निघून जातात. खासकरून पाणी खूप जास्त गरम असेल तर.

यामुळे त्वचा ड्राय बनते आणि खूप खाज येते. 

कोरड्या त्वचेमुळे बॅक्टेरिया त्वचेचं बॅरिअर तोडून आत शिरतात आणि इंन्फेक्शन होण्याची शक्यता असते

Antibacterial soaps नॉर्मल बॅक्टेरियाला मारतात. यामुळे antibiotics ला दाद न देणारे बॅक्टेरियांना पोषक वातावरण तयार होतं 

Immune memory तयार करण्यासाठी रोगप्रतिकारप्रणालीला काही नॉर्मल मायक्रोऑर्गॅनिझम्स, डर्टची गरज असते. त्यामुळेच काही बालरोगतज्ज्ञ आणि त्वचारोगतज्ज्ञ मुलांना रोज आंघोळ घालू नका अशी शिफासर करतात. 

पाण्यामध्ये मीठ, हेवी मेटल्स, क्लोरिन, फ्लुऱॉइड, किटकनाशकं आणि इतर केमिकल्स असतात. ज्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे रोज आंघोळ केल्यामुळे आरोग्याला काही फायदा होत नाही. उलट त्वचा आणि इतर त्रास होण्याची शक्यता असते असं तज्त्रज्ञांच मत आहे.  

https://www.health.harvard.edu/blog/showering-daily-is-it-necessary-2019062617193#:~:text=While%20there%20is%20no%20ideal,armpits%20and%20groin%20may%20suffice.

मग आंघोळ किती वेळा करावी? डॉ. रॉबर्ट शमेरलिंग लिहितात, याचं ठोस उत्तर नाही. आठवडाभरात काहीवेळा आंघोळ केली तरी चालेल. तर वेबएमडीच्या माहितीनुसार, बहुतांश लोकांना आठवड्यातून 2-3 वेळा आंघोळ केली तरी पूरे. ज्यामुळे आरोग्य चांगलं रहाण्यास मदत होते. पण हे लाइफस्टाइलवर अवलंबून आहे. डॉ. शमेरलिंग पुढे लिहितात, शॉर्ट शॉवर म्हणजे 3-5 मिनिटं आंघोळ करा. काख, दोन पायांमधील जागा यावर जास्त फोकस करा. आंघोळ करताना चेहरा धुतलेलाही चांगला ज्यामुळे फ्रेश वाटतं. पण गरज नसेल तर शरीराचे इतर अवयव स्वच्छ करणं गरजेचं नाही. 

तुम्हाला माहितेय अमेरिकेत दोन-तृतीअंश लोक तर ऑस्ट्रेलियात ८० टक्के रोज आंघोळ करतात. पण चीनमध्ये ५० टक्के लोग आठवड्यातून दोन वेळाच आंघोळ करतात. 

Image Source: Deposite Photos

https://www.webmd.com/beauty/shower-how-often

Leave a comment