फक्त 3 सवयींनी दिसा 10 वर्षांनी तरुण! | Anti-Aging Secret

तुम्ही लहान वयातच म्हातारे दिसायला लागलात? मग रोजच्या या 3 सवईंनी तुम्ही म्हतारपणाला मुठीत करू शकता. तरूण रहाण्याचा हा फंडा अमेरिकेतील डॉ. कर्ट हॉंग यांचा आहे. ते 52 वर्षांचे आहेत. पण त्यांचा दावा आहे की, त्यांचं biological age 41 वर्ष आहे म्हणजे 11 वर्षांनी कमी आहे. तरूण रहाण्याचा हा कोणता फंडा?

biological age म्हणजे सोप्या शब्दात शरीरातील पेशी आणि टिश्यू यांचं वय. ज्यावेळी हे वय chronological age वयानुसार वाढणाऱ्या वयापेक्षा जास्त होतं. त्यावेळी आपण म्हतारे दिसायला लागतो. मग तरूण रहाण्याचा डॉ. हॉंग यांंचं सिक्रिट काय? सांगतो.    

Buusiness Insider च्या वेबसाइटवर मला डॉ. हॉंग यांच्याबाबत माहिती मिळाली. ते हेल्दी रहाण्यासाठी या तीन गोष्टी रोज करतात.   

ते फळं आणि भाज्या भरपूर असणारं Mediterranean diet फॉलो करतात

फक्त Vitamin D च्या सप्लिमेंट घेतात

रोज कार्डियो आणि वेटलिफ्टिंग वर्कआउट करतात

मेंदूला चालना देण्यासाठी चॅलेन्ज करतात

डॉ. हॉंग लठ्ठपणाचे डॉक्टर, न्यूट्रीशनल रिसर्चर आणि आहेत. Buusiness Insider शी बोलताना ते म्हणाले,  १८ महिन्यांपूर्वी biological age टेस्ट केली. ज्यात वय ४१ म्हणजे ११ वर्ष कमी दाखवलं. biological age टेस्ट करण्यासाठी ते PhenoAge algorithm वापरतात. ज्यात वाढतं वय, मेटॅबॉलिक हेल्थ आणि इन्फमेशन लेव्हल याचा अभ्यास केला जातो. 

ते म्हणतात, कार्डियोने आपलं हार्ट चांगलं रहातं. डी व्हिटॅमिनमुळे कॅल्शियम चांगलं शोषून घेतलं जातं आणि बुद्धिबळ खेळल्यामुळे किंवा वाचन केल्यामुळे मेंदूला चालना मिळते. 

communication Biology जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनात 4 लाखांपेक्षा अधिक लोकांवर अभ्यास करण्यात आला. यात संथ गतीने चालणाऱ्यांपेक्षा वेगाने चालणाऱ्यांंचं  वय त्यांच्या बायोलॉजीकल वयापेक्षा 16 वर्षांनी कमी दाखवत असल्याचे दिसून आलं. 

तर Cleaveland Clinic च्या माहितीनुसार, हेल्दी फूड खाणं, रोज व्यायाम, रात्री शांत झोप, कमी स्ट्रेस किंवा ताण आणि स्मोकिंग बंद केल्यामुळे आपण  biological age सुधारू शकतो. तर biological age तपासण्यासाठी रक्तदाब, रक्तातील सारखेचं प्रमाण, कॉलेस्ट्रोल लेव्हल, हार्टरेट आणि उंची-वय तपासून याबाबत माहिती मिळू शकते. 

डॉ. हॉंग यांचा फंडा खूप सोपा आणि रोज सहज करता येण्यासारखा आहे. ट्राय करून पाहा. रोजच्या तीन चांगल्या सवईंनी तुम्ही तरूण राहू शकता. 

Imaage Source: Shutterstock

Source:

https://www.businessinsider.com/3-simple-habits-longevity-doctor-reversed-biological-age-11-years-2025-8#:~:text=Dr.%20Kurt%20Hong%2C%2052%2C,and%20weightlifting%20workouts%20each%20week.

https://www.nature.com/articles/s42003-022-03323-x

https://health.clevelandclinic.org/biological-age

Leave a comment