जेवणानंतर गॅस-अपचन? 🍽 Sitting Posture बदलून Relief मिळवा! उभं राहून जेवणं Good or Bad?

तुम्ही बऱ्याचवेळा ऐकलं असेल. पोट चांगलं तर शरीर निरोगी. जंक फूड, वेळी-अवेळी खाणं यामुळे गॅस, अॅसिडिटी, चरबी वाढणं या समस्या निर्माण होतात. तुम्हाला माहितीये- आपण कोणत्या पोझिशनमध्ये जेवतो यावर अन्नपचन अवलंबून असतं. आपण जेवताना कसं बसावं याची माहिती जाणून घेऊया.

जेवतानाची पोझिशन अन्न गिळण्यास, चावण्यास आणि श्वास घेण्यास महत्त्वाची ठरते. खाताना पोझिशन योग्य नसेल तर अन्न गिळण्यास त्रास होतो. काही लोक खाली मांडी घालून म्हणजेच सुखासन पोझिशनमध्ये जेवतात. पण हल्ली डायनिंग टेबलमुळे बहुतांश खुर्चीवर बसून जेवतात. दोन्ही स्थितीत बसू शकतो पण बसण्याच्या पोझिशनमध्ये हा छोटा बदल तुमच्यासाठी मॅजिक ठेरेल.

यूके NHS Foundation Trust च्या Bradford District Care च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार,

टेबलवर सरळ, ताठ बसणं ही खाण्या-पिण्यासाठी सर्वात चांगली पोझिशन आहे. सोप्या शब्दात समजावतो. जेवताना दोन्ही पाय जमिनिवर असले पाहिजेत

पाठीचा कणा – खासकरून कमरेमधील मणके ताठ असतील याकडे लक्ष द्या

जेवण तुमच्या समोर असलं पाहिजे

काही लोकांना पाठ आणि हातांना सपोर्टची गरज लागू शकते. तुम्ही खुर्चीवर बसला असाल तर पाठ खुर्चीला टेकवू नका- पाठ खुर्चीला रेस्ट करू नका

आणि खाली बसला असाल तरी पाठीचे मणका ताठ ठेवा. या सोप्या उपायाने गॅस, अपचन समस्या दूर होण्यास मदत मिळते.

पबमेडमध्ये छापलेल्या रिसर्चनुसार, सरळ किंवा ताठ स्थितीत जेवल्यामुळे अन्नातील प्रोटीनचं पचन आणि पोट रिकामं होण्याची प्रक्रिया वेगाने होते. रक्तातील अमिनो अ‍ॅसिडची उपलब्धता वाढते, कारण प्रथिनांचे विघटन आणि अमिनो अ‍ॅसिडचे शोषण अधिक जलद होतं. म्हणून, आडवं न पडता सरळ बसलेल्या स्थितीत अन्न सेवन करणे हे जेवणानंतर स्नायूतील प्रथिन संचयन योग्य पद्धतीने होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

Henry Ford Health वेबसाइटवरील माहितीनुसार, बसून खाल्यामुळे तुम्ही अन्नाचा आनंद घेऊ शकता आणि अन्न हळू खाता. अन्न पोटात जास्त रहातं आणि जेवल्यानंतर पोट भरल्याचं सेन्सेशन होतं. अन्न योग्य पद्धतीने चावल्यामुळे पचनासाठी मदत होते. तर फ्लोरिडा विद्यापिठाच्या संशोधनानुसार, बसून खाल्ल्यास अन्नाची चव अधिक चांगली वाटते. त्यांच्या संशोधनानुसार, बसून पिता चिप्स खाल्लेल्या लोकांना उभं रहाणाऱ्यांच्या तुलनेत अन्नला चांगले मार्क दिले होते.

तुम्ही कामाच्या घाईत उभं राहून जेवता? कधी-कधी मी देखील उभ्या-उभ्या जेवतो. उभं राहून जेवू नको- हे मी आईकडून अनेकदा ऐकलंय. मला प्रश्न पडला. उभं राहून जेवलं तर काय होतं? थोडा रिसर्च केला. चला या व्हिडियोतून अधिक माहिती जाणून घेऊ.  

हेल्थलाइनच्या माहितीनुसार, उभं राहून खाल्यामुळे अन्नपचन पटकन होतं आणि कालांतराने शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते. म्हणून बारीक होण्यासाठी उभं राहून खाणं सुरू करू नका. हा व्हिडीयो पूर्ण पाहा. उभ राहून खाण्याच्या सवयीमुळे ब्लोटिंग आणि भूक जास्त लागू शकते. ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

आपण जेवताना कोणत्या स्थितीत असतो यावर अन्नपचन प्रक्रिया अवलंबून असते. Henry Ford Health वेबसाइटवर लिहीलंय-बसून आणि उभं राहून जेवल्यामुळे अन्नपचन प्रक्रियेत थोडा बदल होतो. उभं राहून जेवल्यामुळे बसून किवा झोपून जेवण्याच्या तुलनेत अन्न लवकर पचतं आणि अन्न पोटातून लवकर रिकामं होण्यास मदत मिळते. याचं नेमकं कारण माहित नाही पण गुरूत्वकर्षणामुळे असं होत असावं असा अंदाज आहे. 

Henry Ford Health च्या माहितीनुसार, उभं राहून जेवल्यामुळे पोटात ब्लोटिंग, क्रॅम्स किंवा गॅस होऊ शकतात. पोटातून अन्न लवकर डायजेस्टिव्ह टॅकमध्ये गेल्यामुळे ही लक्षणं दिसून येतात. तुम्हाला कधी फरक जाणवला का? उभं राहून खाल्यामुळे तुम्ही जास्त पटपट खाता. आता एकदा नक्की लक्ष देऊन पागा. उभं राहून जेवल्यामुळे तुम्ही जास्त हवा स्वॉलो करता किंवा गिळता. 

हेल्थलाइनच्या माहितीनुसार, उभं राहून खाल्यामुळे वजन कमी होतं असं काही लोकांचं मत आहे. याचं कारण 2018 च्या संशोधनात आढळून आलं की- सहा सात उभं राहिल्यामुळे बसल्यापेक्षा 54 कॅलरी जास्त बर्न होतात. पण या उलट उभं राहून खाल्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागण्याचं सेन्सेशन होऊ शकतं, असं हेल्थलाइनच्या आर्टिकलमध्ये लिहीण्यात आलंय. 

उभं राहून खाण्याचा एक आश्चर्यकारक परिणाम फ्लोरिडा विद्यापिठाच्या संशोधकांना आढळून आला. जर्नल ऑफ कन्झ्युमर रिसर्चमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, जेवणाची स्थिती चव जाणण्यावर परिणाम करते उभं राहून खाल्ल्यास अन्नाची चव योग्य कळत नाही. यासाठी संशोधकांनी  ३५० लोकांवर प्रयोग केला. पिटा चिपची चव कशी वाटते याचं मूल्यांकन करण्यास सांगितले. ज्यांनी उभं राहून चिप खाल्ले- त्यांनी त्याला कमी गुण दिले. संशोधकांच्या माहितीनुसार, उभं राहून खाल्यामुळे फिजिकल स्ट्रेस येतो आणि टेस्टबड्सची जाणीव बदलते. 

Image Source: Freepick

Leave a comment