अस्थमा रुग्णांसाठी गुड न्यूज 💊 | 50 वर्षांनी सापडलं नवीन औषध

भारतातील अस्थमा रुग्णांची संख्या

35,00,00,000 million

अस्थमामुळे दररोज 1000 लोकांचा मृत्यू

जगभरात 262 million अस्थमा रुग्ण

ग्लोबल अस्थमा रिपोर्ट 2022 चे आकडे धक्कादायक आहेत. दमा किंवा अस्थमा श्वसनाचा आजार आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींना हा त्रास होतो. अस्थमा गंभीर स्वरूपाचा असला तरी काळजी आणि योग्य ट्रिटमेंटने बरा होऊ शकतो. तुम्हाला किंवा नातेवाईकांमध्ये दमा असेल तर तब्येत-पाणीचा व्हिडीयो नक्की पाहा आणि सब्क्राइब करा. गेल्या 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच दम्यावर नवीन औषध सापडल्याचा दावा संशोधकांनी केलाय. किंग्ज कॉलेज लंडनच्या माहितीनुसार, हे इंजेक्शन काही दमा किंवा फुफ्फुसांच्या क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिज (COPD) आजारात येणाऱ्या अटॅक दरम्यान दिल्यास खूप प्रभावी असल्याचं आढळून आलंय. सद्य स्थितीत दिल्या जाणाऱ्या स्टिरॉइच्या तुलनेत पुढची ट्रिटमेंट ३० टक्के कमी होत असल्याचं यात आढळून आलंय.

नवीन औषध काय आहे?

संशोधकांच्या माहितीनुसार, नवीन औषधाचा वापर रोग प्रतिकार यंत्रणेतील विशिष्ट भागावर केला जातो. दमा आणि COPD अटॅकमध्ये त्रास वाढल्यामुळे हा भाग जास्त सक्रिय होण्याची शक्यता असते. नवीन औषधाबाबात लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसीन या जर्नलमध्ये माहिती देण्यात आलीये. किंग्ज कॉलेज लंडनच्या मते, नवीन औषध जगभरातील कोट्यावधी रुग्णांसाठी संजीवनी ठरू शकतं. या औषधाचं नाव आहे ‘बेनरालिझुमॅब’. याचा वापर अत्यंत गंभीर रुग्णांमध्ये केला जातोय. पण, नवीन संशोधनानुसार आता याचा वापर रुटिलनली करणं शक्य आहे. ‘बेनरालिझुमॅब’वर किंग्ज कॉलेज लंडनच्या संशोधकनांनी अभ्यास केलाय.

‘बेनरालिझुमॅब’ चा फायदा काय?

किंग्ज कॉलेज लंडनच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ‘बेनरालिझुमॅब’ एक मोनोक्लोनल एंटीबॉडी आहे. हे औषध फुफ्फुसातील सूज कमी करण्यासाठी इओसिनोफिल्स (eosinophils) नावाच्या विशिष्ट पांढऱ्या पेशींवर हल्ला करतं. याच पेशींमुळे फुफ्फुसात सूज येण्याची आणि फुफ्फुसाची हानी होण्याची शक्यता असते. ट्रायलमध्ये आढळून आलं की याचा डोस ठराविक ठिकाणी दिल्यास हे स्टिरॉइडपेक्षा अधिक प्रभावी आहे. इओसिनोफिल्स दम्याच्या साधारण ५० टक्के केसमध्ये आणि COPD च्या एक तृतीयांश प्रकरणासाठी कारणीभूत असताच.

संशोधनाच्या प्रमुख प्राध्यापक मोना बाफाढेल म्हणतात, ‘बेनरालिझुमॅब’ अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आहे. आम्ही हे एका वेगळ्या प्रद्धतीने वापरलं. यावरून दिसून आलं की विशिष्ट जागी हे औषध दिल्यास स्टिरॉइडपेक्षा जास्त प्रभाव पडतो. सर्व रुग्णांना एकच पद्धतीने उपचारापेक्षा हायरिस्क रुग्णांवर टार्गेटेड पद्धतीने उपचार केल्यास फायदा होतो.

जनरल प्रॅक्टिस आणि अतिदक्षता विभागात हे औषध सहज दिलं जाऊ शकतं असं संशोधकांच मत आहे. किंग्ज कॉलेज लंडनच्या माहितीनुसार, औषध दिल्यानंतर 28 दिवसांनी कफ, श्वास घेण्यात येणारा अडथळा आणि थुंकीत बरेच समाधानकारक बदल झाले. नव्वद दिवसानंतर आढळलं की प्रीडनिसोलोन घेणाऱ्या अस्थमा रुग्णांच्या तुलनेत बेनरालिझुमॅब’ घेणाऱ्यांची संख्या चार पटीने कमी झाली. हे औषध फेल झालं नाही. त्यामुळे रुग्णांचं क्वालिटी ऑफ लाईफही सुधारलं.

ट्रायलमध्ये काय आढळलं?

या अभ्यासात 158 रुग्णांचं निरीक्षण करण्यात आलं.

लँसेट रेस्पिरटरी मेडिसिन- उपचारात अपयश येण्याचं प्रमाण हे स्टेरॉइड्स घेत असताना 74% नवीन उपचार पद्धतीने हे फक्त 45% टक्के आढळलं

रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे जाणाऱ्यांची संख्या कमी झाली

प्राध्यापक मोना बाफाढेल पुढे सांगतात, हे औषध गेम-चेंजर ठरू शकतं. आपल्या उपचार पद्धतीत गेल्या 50 वर्षांत बदल केलेला नाही. त्यामुळं जास्त त्रास होणाऱ्या रुग्णांवर उपचार पद्धतीत यामुळं क्रांती येऊ शकते. दमा किंवा COPD चे झटके वेगळे असतात. प्रत्येक रुग्णांमध्ये रोग प्रतिकार संस्थेचे भाग हे विविध प्रतिक्रिया देत असतात. सूज येण्याचे पॅटर्न वेगळे असतात. आपण अधिक स्मार्टपणे याचा विचार करून योग्य रुग्णाला योग्य वेळी योग्य उपचार देऊ शकतो.

दमा म्हणजे काय?

अस्थमा फुप्फुसापर्यंत जाणाऱ्या श्वसननलिकेच्या दाहामुळे होतो. दाह होत असल्यामुळे हा मार्ग संवेदनशील होतो. दम्यासाठी अनेक कारणं कारणीभूत आहेत. काही कारणं जनुकीय असतात. काही कुटुंबात अनेक पिढ्यांमध्ये दमा दिसून येतो. वातावरणातील घटकही यासाठी कारणीभूत असतात. प्रदुषित हवा, परागकण, धुळ, रासायनांच्या ज्वलनातून तयार होणारा धूर, सिगारेटचा धूर दम्याची लक्षणं वाढवू शकतात.

दम्याचा अटॅक आल्यानंतर इन्हेलर वापरतात. काही इन्हेलर त्रास सुरू झाल्यावर वापरतात, त्यामुळे थोडा आराम मिळतो. तर काही दम्याची लक्षणं वाढू नयेत यासाठी वापरले जातात. तर काहींना गोळ्या दिल्या जातात. काहींमध्ये दम्याचा त्रास आयुष्यभर दिसून येतो. उपचार न करता दुर्लक्ष केलं तर त्रास वाढू शकतो. श्वास घेण्यास त्रास, घरघर, खोकला आणि छाती अडकल्यासारखी होणं अशा प्रकारात इनहेलरनं त्रास नियंत्रणात आणणं शक्य नसेल तर डॉक्टर स्टेरॉइड्सचा कोर्स करण्याचा सल्ला देतात.

2025 मध्ये वापरात येणार का नाही?

बीबीसीच्या माहितीनुसार, ‘बेनरालिझुमॅब’ अजूनही सर्वत्र किंवा व्यावसायिक वापरासाठी नाहीये. याची अजूनही चाचणी सुरू आहे. 2025मध्ये पुढची चाचणी सुरू होईल. जी दोन वर्ष चालेल जेणेकरून याचे फायदे समोर येतील.

आमच्या चाचणी हे औषध प्रभावी असल्याचं आढळून आलंय. दमा आणि COPDच्या रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. COPDमुळे जगभरात हजारो लोकांचा मृत्यू होतो. पण यावरील उपचार अजूनही 20 व्या शतकातीलच आहेत. या रुग्णांचा आपल्याला जीव वाचवावा लागेल. असं डॉ संजय रामाकृष्णन म्हणाले. Dr Sanjay Ramakrishnan, Clinical Senior Lecturer at the University of Western Australia

या चाचणीत सहभाग घेतलेले जिओफ्री पॉन्टिंग म्हणतात, त्रास होताना कसं वाटतं हे सांगता येणं शक्य नाही. पण हे इंजेक्शन खूप चांगलं आहे. मला यामुळे स्टिरॉइड घेतल्यानंतर होणारे साईट इफेक्ट झाले नाहीत. स्टिरॉइडमुळे मला झोप येत नसे. आता मला खूप छान वाटतंय. तब्येत पाणीचा हा व्हिडीयो कसा वाटला हे नक्की कॉमेंटकरून किंवा ई-मेल लिहून कळवा. नक्की सब्क्राइब करा…तब्येत-पाणी. भेटूया पुढच्या नव्या व्हिडीयोत.

Image Source: Freepick

Leave a comment