काय मंडळी… मग कुठे प्लान करताय 31 चं सेलिब्रेशन? घरीच…का मित्रांसोबत कल्ला. हॉटेल, नाईट-आऊट, पार्टी..फूल-टू धिंगाणा आणि मस्ती करताना..वाईच दमानं घ्या…नाही…म्हटलं हॅंगओव्हरने वर्षाचा पहिला दिवसच खराब होईल..आणि हो.. जास्त झाली तर विचाराल…मैं कहां हूं.. दारू पिऊन गाडी अजिबात चालवू नका. नाहीतर, नवीन वर्षाची सुरूवात जेलमधूनच पक्की…बरं..ते हॅंगओव्हरवरून आठवलं. मद्यपानानंतर होणारी अवस्था टाळण्यासाठी हल्ली एक फॅड निघालंय. IV Threapy चं. ऐकलंय का तुम्ही? जगभरातील अनेक महानगरात हॅंगओव्हर उतरवण्यासाठी क्लिनिक सुरू झालीयेत. याला वैद्यकीय आधार आहे? याने हॅंगओव्हर बरा होतो? ही क्लिनिक कोणत्या नियमांखाली सुरू आहेत? असे प्रश्न तज्ज्ञांकडून विचारले जाच आहेत.
IV Threapy म्हणजे काय?
31 चं सेलिब्रेशननंतर अनेकांच्या तोंडी सकाळी उठल्यानंतर पहिलं वाक्य असतं..यार..हॅंगओव्हर झालाय. डोकं जड झालेलं असतं. पोटात गडबड सुरू असते. मानगुटीवरचं हे भूत उतरवण्यासाठी लिंबू पाण्याचा जोरदार मारा सुरू होतो. काही अॅस्पिरिनची गोळी घेतात. तर काही झोपून रहाणं पसंत करतात. तज्ज्ञांच्या मते, हॅंगओव्हर कमी करण्याचा एक नवीन ट्रेन्ड म्हणजे IV Threapy. सोप्या भाषेत सांगायचं तर, यात सलाइनच्या मदतीने रक्तात पोषक द्रव्य सोडली जातात. न्यूयॉर्कच्या युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर मेडिकल सेंटरच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, IV drip मध्ये द्रव पदार्थ, इलेक्ट्रोलाइट्स, व्हिटॅमिन आणि काहीवेळा औषध असतात. या गोष्टी शरीराला पुन्हा रिहायड्रेट करण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे डोकेदुखी, थकवा आणि नॉशासारखी लक्षणं बरी होण्यात मदत होते. रॉचेस्टर मेडिकल सेंटरच्या डॉ. सॅंडी वॅंग यांच्या महितीनुसार, रुग्णाला IV fluids देण्यापूर्वी त्यांची रक्ततपासणी केली पाहिजे. काही लोकांना याचा त्रास होण्याची शक्यता असते.
IV Threapy ने हॅंगओव्हर उतरतो?
IV Threapy च्या मागची वैद्यकीय आणि शास्त्रीय भूमिका काय? या थेरपीची वैधता काय? असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या थेरपीची कोणतीही वैधता नाही. पेन्सलव्हेनिया विद्यापिठाच्या ब्लॉगवर लिहीण्यात आलंय, या सेवा दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे याची सुरक्षा, प्रभावीपणा याबाबत काळजी व्यक्त केली जातेय. याचं कारण, या सेवांवर कोणाचाही अंकूश नाही. तज्ज्ञ सांगतात, IV fluids यकृताचं कार्य वाढवत नाहीत. यकृताकडून अल्कोहोल ब्रेकडाऊन केलं जातं जेणेकरून ते शरीरातून बाहेर टाकता येईल. हॅकेनसॅक मेरिडियन हेल्थच्या ब्लॉगवर लिहीण्यात आलंय, IV fluids ने रिहायड्रेट करूनही हॅंगओव्हर बरा होणार नाही. कारण डी-हायड्रेशन फक्त एक लक्षण आहे. IV treatment – मग त्यात इलेक्ट्रोलाइट्स आणि व्हिटॅमिन असेल तरी हॅंगओव्हरची लक्षणं डोकेदुखी, मळमळ, लक्ष केंद्रीत करण्यात अडथळा, डिलेड रिअॅक्शन टाईम आणि लाईट-आवाजाबाबत संवेदनशीलता ही लक्षणं बरी होणार नाहीत. टाईम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत पेन मेडिसिनचे असोसिएट प्रोफेसर डॉ. डेव्हिड आयझेनबर्ग म्हणाले, हॅंगओव्हर पूर्ण बरा होण्यासाठी ठोस उपचार नाहीत. हॅंगओव्हर मेंदूपासून ते गॅस्ट्रोइंटेस्टाइनल टॅक्ट प्रत्येक अवयवावर परिणाम करतो. त्यामुळे हॅंगओव्हरच्या सर्व लक्षणांवर कोणतंही एक मॅजिक क्युअर नाही.
जास्त मद्यपान केलेल्या रुग्णांना IV therapy दिली तर फायदा होतो का? यावर 2023 मध्ये जपानच्या संशोधकांनी अभ्यास केला होता. त्यात असं आढळून आलं की, अतिमद्यपान केलेल्या व्यक्तीला IV therapy दिल्यानंतर त्या व्यक्तीला शुद्ध येण्याच्या वेळेत काही अमूलाग्र बदल झालेला दिसून आला नाही.
हॅंगओव्हर क्लिनिकचा रेट किती?
हॅंगओव्हरवर चुटकी मे गायब…म्हणून या IV Threapy चा ट्रेन्ड सुरू झाला. जगभरातील मोठ्या महानगरांमध्ये हॅंगओव्हर क्लिनिक सुरू आहेत. भारतात मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैद्राबाद यांसारख्या शहरांमध्ये ही क्लिनिक सर्रास सुरू आहेत. या क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट घ्यावी लागते. क्लिनिकमध्ये गेल्यानंतर IV Threapy दिली जाते. तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्या आहेत यावरून किंमत ठरवली जाते. साधारणत 10000 ते 50000 रूपयांपर्यंत खर्च येऊ शकतो असा अंदाज आहे. 25 ते 40 वयोगटातील तरूणांमध्ये ही क्लिनिक खूप पॉप्युलर आहेत. हॅंगओव्ह होण्याची प्रमुख चार कारणं आहेत –
अल्कोहोलमुळे शरीरात पाणी रहात नाही. जेवढे द्रव पदार्थ घेता त्यापेक्षा जास्त निघून जातं.
जास्त दारूमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सवर परिणाम होतो
काही दारूमध्ये फरमेंटेशन होताना काही केमिकल्स तयार होतात. ज्यामुळे हॅंगओव्हर वाढतो
यकृतात अल्कोहोल ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याचे बायप्रॉडक्ट तयाप होतात. या गोष्टींमुळे डोकेदुखी आणि नॉशा होतो.
IV Threapy करण्यापेक्षा कोणते उपाय करावेत?
हॅकेनसॅक मेरिडियन हेल्थच्या ब्लॉगवर दिलेल्या माहितीनुसार, मद्यपान केल्यानंतर हॅंगओव्हर झाला तर या गोष्टी केल्या पाहिजेत.
शरीराला रि-हायड्रेट होण्यासाठी पाणी प्या किंवा इतर द्रव पदार्थांचं सेवन करा
शक्य तेवढा आराम करा
डोकेदुखीसाठी स्टिरॉइड नसलेली औषध डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.
मळमग जास्त होत असेल तर डॉक्टरांना विचारून औषधं घ्या.
तर मग मित्रांनो..नवीन वर्षाचं स्वागत करताना धमाल-मस्ती होऊदे..पण जरा दमानं…दारू न पिणं हे चांगलच..पण लिटील-लिटील झाली तरी…कंट्रोल ठेवा म्हणजे झालं. नाहीतर, नववर्षाची सकाळ हॅंगओव्हरमुळे खराब होईल आणि शरीराला त्रास होईल तो वेगळाच. तब्येत-पाणीचा हा एपिसोड कसा वाटला ते नक्की कळवा. पटकन सब्क्राइब करा..तब्येत-पाणी.

Image Source: Freepick