Breast Cancer Awareness Month : Self Breast Examination किंवा स्तनांची स्वत:च तपासणी कशी करायची?

  • 2022 मध्ये जगभरात 6,70,000 महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यू
  • जगभरातील 185 देशांपैकी 157 देशात ब्रेस्ट कॅन्सर महिलांना प्रामुख्याने होणारा कॅन्सर
  • भारतात साल 2022 मध्ये 98,337 महिलांचा मृत्यू ब्रेस्ट कॅन्सरमुळे

हे आकडे वाचून धक्का बसला ना? हे आकडे फक्त वाचून सोडून देऊ नका. ब्रेस्ट कॅन्सर कसा होतो? याची लक्षण कशी ओळखायची? याबाबत प्रत्येक महिलेला जागरूक होणं गरजेचं आहे. ब्रेस्ट कॅन्सरची लक्षण वेळीच ओळखता आली, तर जीव वाचू शकतो.

तज्ज्ञ सांगतात, ब्रेस्ट कॅन्सरची लक्षण ओळखण्यासाठी प्रत्येक महिलेने ‘Self Breast Examination’ सोप्या शब्दात घरच्याघरी स्तनांची तपासणी केली पाहिजे. हो, हे सहज शक्य आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण Self Breast Examination’ म्हणजे काय आणि स्तनांची तपासणी कशी करायची, हे जाणून घेऊया.

‘Self-Breast Examination’

स्वत:च स्वत:च्या स्तनांची तपासणी करणं म्हणजे ‘Self-Breast Examination’. कॅन्सरतज्ज्ञांच्या मते, महिला घरीच सोप्या पद्धतीने, अगदी काही मिनिटात ‘Self-Breast Examination’ करू शकतात. स्तनांमध्ये अचानक काही बदल झालाय का? स्तनांमध्ये वेगळेपण दिसून येतंय का? हे तपासणं म्हणजे ‘Self-Breast Examination’. मग, करू शकता का नाही हे तुम्ही? सहज शक्य आहे.

Breast Examination का महत्त्वाचं?

तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे, ब्रेस्ट कॅन्सरची लक्षण वेळीच ओळखण्यासाठी Breast Examination महत्त्वाचं आहे. वेळीच निदान झाल्यास योग्य उपचारामुळे जीव वाचू शकतो. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये स्तनांच्या पेशींची बेसूमार वाढ सुरू होते. याचं रूपांतर ट्यूमर किंवा गाठीमध्ये होतं.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी स्तनांमधील दूध उत्पादन करणाऱ्या ग्रंथींमध्ये सुरू होतात. या स्टेजमध्ये योग्यवेळी निदान झालं तर जीव वाचू शकतो. पेशींची वाढ झाली की या पेशी पसरतात आणि गाठ तयार होते.

  • अमेरिकेत नवीन कॅन्सरग्रस्त दर तीन महिलांच्या मागे एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते.
  • भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतातील एकूण कॅन्सरग्रस्त महिलांच्या संख्येत ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण 25 ते 30 टक्के आहे. भारतात गेल्या 20 वर्षांत स्तनांच्या कॅन्सरने ग्रस्त महिलांची संख्या वाढतेय.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 20 ते 40 वर्ष वयोगटातील महिलांमध्ये स्तनांच्या कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. या मुली-महिलांमध्ये ‘Self-Breast Examination’बाबत जागरुकता नाही. कॅन्सरच्या योग्यवेळी निदानासाठी स्वत:च्या स्तनांची तपासणी महत्त्वाची आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे, “स्वत:च स्तनांची तपासणी केल्याने स्तनांच्या कॅन्सरचं निदान लवकर होण्यास मदत मिळते.”

ब्रेस्ट कॅन्सरची भारतातील आकडेवारी

साल ब्रेस्ट कॅन्सर रूग्णसंख्या साल ब्रेस्ट कॅन्सर मृत्यू

2019 200218 2019 74481

2020 205424 2020 76414

2021 210714 2021 78387

2022 216108 2022 80390

2023 221579 2023 82429

स्तनांची तपासणी म्हणजे काय?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, Self-Breast Examination’ आरशासमोर उभं राहून किंवा झोपून करू शकतो.

Self-Breast Examination

Image Source- Freepik

  • स्तनांचा आकार, रंग बदललाय का याकडे लक्ष द्या
  • स्तनांना सूज येणं, स्तन लाल होणं किंवा स्तनांवर व्रण आलेत हे काळजीपूर्वक पाहा
  • स्तनाग्रांची (निप्पल) जागा बदलली आहे का याकडे लक्ष ठेवा
  • निप्पल आतील बाजूस गेल्यासारखे दिसत असतील तर वेळीच लक्ष देणं गरजेचं
  • निप्पलमधून पाणी, रक्त किंवा पिवळ्या रंगाचा पदार्थ बाहेर येतोय का याकडे लक्ष ठेवणं

अशी करा ‘Self-Breast Examination’

  • हाताच्या तीन बोटांनी स्तनांच्या वर, खाली, दोन्ही बाजूला, गोलाकार पद्धतीने स्तनांवर हात फिरवून पाहा
  • तीन बोटांच्या मदतीने काखेत हळूवार दाबा
  • हात डोक्यावर उचलून हातांचे तळवे एकमेकांना जोडून स्तनांची पहाणी करा
  • स्तन वर उचलून खालच्या बाजूला काळजीपूर्वक पाहा

अमेरिकेतील मायो क्लिनिकच्या माहितीनुसार पाठीवर झोपून किंवा आंघोळ करताना देखील तुम्ही स्तनांची तपासणी करता येते.

पाठीवर झोपा. पाठीवर झोपल्यामुळे स्तनांचे टिश्यू स्प्रेड होतात. Breast टिश्यूंना स्पर्श केल्यानंतर ते जाणवणं सोपं जातं.

आंघोळ करताना हाताला आणि स्तनांना साबण लावा. यामुळे बोटांनी स्तनांची तपासणी सहज होते.

(Source: https://www.mayoclinic.org/tests-procedures/breast-exam/about/pac-20393237)

केव्हा करावी स्तनांची तपासणी?

तज्ज्ञांनी सांगतात

  • मासिक पाळीनंतर चार-पाच दिवसांनी
  • स्तन सॉफ्ट किंवा मऊ असताना

स्तनांची तपासणी करावी. स्तनांच्या तपासणीसाठी वेळ फारसा लागत नाही. तीन ते पाच मिनिटात आपण हे करू शकतो. मासिक पाळी बंद झालेल्यांनी महिन्यातून एकदा ब्रेस्ट तपासणी करणं आवश्यक आहे.”

Breast Cancer ची लक्षणं?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, अनेकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षण आढळून येत नाहीत. त्यामुळे योग्यवेळी निदान होणं महत्त्वाचं आहे.

स्तनांवर गाठ येणं, स्तनांचा आकार बदलणं, स्तनांच्या त्वचेचा रंग बदलणं, आधी सांगितल्याप्रमाणे निप्पलमधून पाणी येणं ही स्तनांच्या कॅन्सरची लक्षणं आहेत.

घाबरून जाऊ नका…स्तनांवरची प्रत्येक गाठ म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर नाही. पण तुम्हाला जागरूक रहाणं गरजेचं आहे.

ब्रेस्ट कॅन्सर पुरुषांना होतो?

हो. पण महिलांच्या तुलनेत पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण 0.5–1% आहे. त्यामुळे पुरुषांनीसुद्धा ‘Self-Breast Examination केलं पाहिजे.

((Note: हा ब्लॉग जागतिक आरोग्य संघटना, भारतीय आरोग्य मंत्रालय आणि वैद्यकीय विद्यापिठांच्या वेबसाटवरून मिळालेल्या माहितीवरून लिहीण्यात आला आहे.))

Image: Freepik

Leave a comment