
चक्रासन.. याला ‘Wheel Pose’ म्हणून ओळखलं जातं. चक्रासनाचा सराव केल्यामुळे मणक्याला चांगला स्ट्रेच मिळतो आणि पाठीचा कणा मजबूत होण्यास मदत मिळते. त्याचसोबत हात आणि पायाच्या स्नायूंना चांगला स्ट्रेच मिळतो आणि स्नायू मजबूत होतात. चक्रासनामुळे शारीरिक आणि मानसिक खूप फायदे होतात.
चक्रासन back bending आसन असल्यामुळे यात पाठीच्या कण्याला चांगला बाक मिळतो. त्यामुळे हे आसन करण्याआधी मणक्याची flexibility किंवा लवचिकता अत्यंत महत्त्वाची आहे.
आता सोप्या शब्दात चक्रासनाच्या स्टेप्स आणि याचे फायदे जाणून घेऊया.
चक्रासन कसं करायचं?
पाठीवर झोपा. गुडघे दुमडलेले असतील आणि टाचा नितंबांना (buttocks) स्पर्श करतील अशा पोझिशनमध्ये ठेवा. दोन्ही पायांमध्ये 30 सेंटिमीटर अंतर.
दोन्ही हात वर घेत हाताचे तळवे कानाजवळ ठेवा. हाताची बोटं खांद्यांच्या दिशेने असतील. ही चक्रासनाची सुरुवातीची पोझिशन आहे.
एक दिर्घ श्वास घ्या. श्वास सोडत शरीर कंबरेतून हळूहळू वर उचला. पाठीला बाक द्या. डोकं जमिनीवर ठेवा जेणेकरून शरीरीचं वजन पेलवता येईल.
हात आणि पाय सरळ करत कंबर शक्य तेवढी वर उचलण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा कंबर उचलताना झटका देऊ नका किंवा खूप जास्त ताण देऊ नका.
आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये मणक्याला शक्य तेवढा बाक देण्याचा प्रयत्न करा. डोकं दोन्ही हातांच्या मध्ये असेल.
या स्थितीमध्ये तुम्हाला शक्य आहे तेवढा वेळ रहाण्याचा प्रयत्न करा. श्वास सामान्य असूदेत. या स्थितीत तुमची छाती ओपन होते.
आसन सोडताना श्वास सोडत कंबर खाली घ्या. पहिल्यांदा डोकं जमिनीवर ठेवा आणि त्यानंतर शरीर जमिनीवर रेस्ट करा.
पाय सरळ करा, हात शरीराच्या बाजूला असतील आणि पूर्णत: रिलॅक्स करा.
चक्रासनाचे फायदे?
मणक्याची लवचिकता वाढते. मणका लवचिक आणि मजबूत बनतो.
छाती ओपन होते त्यामुळे श्वसनप्रणालीचं कार्य सुधारतं.
चक्रासनामुळे हात, पाय आणि ओटीपोटाचे स्नायू मजबूत होतात.
चक्रासन केल्यामुळे पचनक्रिया, नर्व्हस सिस्टिम आणि cardiovascular system चं कार्य सुधारण्यास मदत मिळते.
तणाव दूर होतो आणि मानसिक शांती मिळते.
चक्रासन कोणी करू नये?
पाठीचे आजार असलेल्यांनी किंवा पाठ दुखत असेल तर चक्रासन करू नये.
हृदयरोग, उच्चरक्तदाब, ब्रेन स्ट्रोकच्या रूग्णांनी चक्रासन टाळावं.
ज्यांची मनगटं कमकूवत आहेत किंवा मनगटात जोर नसेल तर किंवा आजारी असताना चक्रासनाचा सराव अजिबात करू नये.
During pregnancy DO NOT DO THIS POSE.
चक्रासन करताना अवेअरनेस कुठे असावा?
चक्रासनाचा अभ्यास करताना अंतिम स्थितीमध्ये मणका, छाती आणि ओटीपोटावर लक्ष केंद्रीत करावं.
((हे मी माझ्या अनुभवावरून लिहीलं आहे. योग प्रशिक्षकाशी बोलून तुम्ही ही आसनं करू शकता))