Yoga: सर्वांगासनाचे हे 5 फायदे माहिती आहेत?

सर्वांगासन…यात तीन शब्द आहेत सर्व-अंग-आसन. हे आसन केल्यामुळे शरीरातील सर्व अवयव आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रभाव पडतो. त्यामुळे याला सर्वांगासन म्हणतात.

सर्वांगासनाचा थेट प्रभाव अंत:स्त्रावी ग्रंथींच्या (Endocrinal System) कार्यप्रणालीवर होतो. खासकरून थायरॉईड ग्रंथीवर. हे आसन योग्य पद्धतीने केल्यामुळे होणारा परिणाम संपूर्ण शरीरावर होत असल्याने, हे आसान अत्यंत फायदेशीर मानलं जातं.

सर्वांगासन कोणी करू नये?

सर्वांगासन करण्याची योग्य पद्धत जाणून घेण्याआधी हे आसन कोणी करू नये हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

हृदयाचा त्रास आणि उच्चरक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी सर्वांगासन करू नये

थायरॉईड ग्रंथी मोठ्या झाल्या असतील तर सर्वांगासन टाळावं. यामुळे थायरॉईडला अधिक इजा होण्याची शक्यता असते.

डोळ्यातील रक्तवाहिन्या कमकूवत असणाऱ्यांनी हे आसन करू नये

स्लिप डिस्कचा त्रास असलेल्यांनी

सर्वांगासन योग्य पद्धतीने करण्याच्या 7 steps?

सर्वांगासनाचे फायदे जाणून घेण्याआधी हे आसन योग्य पद्धतीने कसं करायचे याबाबत जाणून घेऊया.

1- पहिल्यांना पाठीवर झोपा. डोकं आणि पाठीचा कणा एका सरळ रेषेत आहे याची खात्री करा. हाताचे तळवे जमिनीवर आणि पाय सरळ आणि जोडलेले असावेत. या स्थितीमध्ये तुमचा श्वास सामान्य असेल.

2- ओटीपोटाचे स्नायू आकूंचित करत (Contract abdominal muscles) हातांच्या मदतीने पाय हळूहळू वर घ्या. पाय सरळ असतील याची काळजी घ्या.

3- तुमचे पाय vertical पोझिशनमध्ये असतील तेव्हा हात जमिनीवर प्रेस करा.

4- हळूवार पद्दतीने कोणताही जर्क न देता कंबर आणि त्यानंतर मणका जमिनीपासून वर उचला. हात कोपरामध्ये दुमडून तळव्यांनी पाठीला आधार द्या. या पोझिशनमध्ये तुमचं डोकं जमिनीला समांतर तर शरीर vertical पोझिशनमध्ये असेल.

5- हनुवटी छातीच्या दिशेने प्रेस करा.

6- तुमचे पाय सरळ आणि एकमेकांना जोडलेले आहेत याची खात्री करा. पाय आणि मणका एका सरळ रेषेत असूद्यात. या आसनात शरीराचं वजन खांद्यावर असतं. त्यामुळे याला इंग्रजीमध्ये Shoulder Stand असं म्हणतात.

7- शेवटच्या पोझिशनमध्ये डोळे बंद करून पाच ते दहा वेळा सामान्य श्वास घ्या. तुम्हाला जमेल तेवढ्या वेळ या आसनात रहा.

आसन सोडताना..पहिल्यांदा पाय सरळ ठेऊन पुढच्या बाजूला डोक्यामागे घ्या. त्यानंतर पाठीला आधार देणारे हात सोडून जमिनीवर ठेवा. त्यानंतर पाठीचा कणा हळूवार पद्धतीने जमिनीवर ठेवा. आता पाय पुन्हा vertical पोझिशनमध्ये आले असतील. आता पाय हळूवार पद्धतीने खाली आणून जमिनीवर ठेवा. आसन सोडताना शरीराच्या हालचालींवर नियंत्रण अत्यंत महत्त्वाचं आहे.

सर्वांगासन करताना या चूका टाळा

1- सर्वांगासन करताना सामान्यत: होणारी चूक म्हणजे शरीराला जर्क देणं. शरीर वर उचलताना किंवा पुन्हा खाली आणताना केल्या जाणाऱ्या movements या अत्यंत हळूवार आणि नियंत्रित झाल्या पाहिजेत. काही लोकं घाईत आसन करण्याच्या नादात मानेला दुखापत करून घेतात.

2-हे आसन करताना कोणत्याही स्टेपमध्ये डोकं जमिनीवरून वर उचललं जाऊ नये.

3-सर्वांगासनाच्या शेवटच्या पोझिशनमध्ये पाय आकाशाकडे पॉइंट केलेले नसावेत. पाय रिलॅक्स ठेवा.

4- आसनाच्या शेवटच्या पोझिशनमध्ये पाय सरळ vertical पोझिशनमध्ये ठेवणं प्रत्येकाला जमेलच असं नाही. तुमचे पाय डोक्याच्या बाजूने झुकले तरी चालतील पण पायाच्या स्नायूंवर ताण पडू देऊ नका.

सर्वांगासनाच्या शेवटच्या पोझिशनमध्ये किती वेळ रहावं?

पहिल्यांचा सर्वांगासनाचा सराव सरू करताना आसनाच्या शेवटच्या पोझिशनमध्ये काही सेकंद रहा. सराव करून आसनाच्या शेवटच्या पोझिशनमध्ये रहाण्याचा वेळ वाढवा. सर्वांगासनाचे फायदे मिळवण्यासाठी दररोज सराव केल्यानंतर 3-5 मिनिटं राहू शकता.

तुम्हाला सराव नसेल किंवा शरीरात impurities असतील तर सर्वांगासनाच जास्तकाळ राहिल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते.

सर्वांगासनाचे फायदे कोणते?

सर्वांगासनाचा प्रभाव थायरॉईड ग्रंथी, पचनसंस्था, रक्तपुरवठा प्रणाली, reproductive system आणि श्वसनप्रणालीवर वर होतो.

थायरॉईड– सर्वांगासनात थायरॉईड ग्रंथीपर्यंत चांगलं रक्त पोहोचण्यास मदत होते. मेंदूला होणारा सामान्य रक्तपुरवठा थायरॉईड ग्रंथींकडे पाठवला जातो. ज्यामुळे थायरॉईड ग्रंथीना जास्त रक्तपुरवठा होतो आणि त्यांचं कार्य सुधारतं.

रक्तपुरवठा प्रणाली- गुरूत्वाकर्षणामुळे शरीराच्या खालच्या बाजूला असलेल्या अवयवांना रक्तपुरवठा होतो. पण रक्त पुन्हा हृदयाकडे येताना रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे रक्त साचून ‘व्हेरिकोज व्हेन’चा त्रास होण्याची शक्यता असते. सर्वांगासन केल्यामुळे हे साचलेलं रक्त इतर भागांपर्यंत पोहोचतं.

पचनप्रणाली- यकृत, आतडं आणि स्वादूपिंड हे पचनक्रियेतील सर्वात महत्त्वाचे अवयव आहेत. या अवयवांमध्ये रक्त जमा होतं. ज्यामुळे त्यांची अन्न पचन करण्याची प्रक्रिया मंदावते. सर्वांगासनामुळे हे जमा झालेलं रक्त निघून जाऊन चांगला रक्तपुरवठा होतो. या आसनात यकृताला चांगला मसाज होतो. तर तोंडात असलेल्या लाळग्रंथींवरही याचा चांगला परिणाम होतो.

सर्वांगासनाचा नियमित सराव केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तर, फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनची देवाण-घेवाण चांगल्या पद्धतीने होण्यास मदत मिळते.

लहान, मोठे, पुरुष आणि महिला सर्वांगासनाचा सराव सर्व करू शकतात. वयस्कर व्यक्तींनी सर्वांगासन करताना खास काळजी घेणं गरजेचं आहे.

@Mayank Bhagwat

Leave a comment