मुलांमध्ये एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवणारं ‘त्राटक’ कसं करायचं?

त्राटक, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, एकटक एखाद्या सूक्ष्म गोष्टीकडे बघत रहाणे. योगविद्येच्या हठयोग प्रकारातील त्राटक एक षट्कर्म आहे. योगाभ्यासात हठयोग प्रदिपिकेचं मोठं महत्त्व आहे. स्वामी मुक्तिबोधानंद हठयोग प्रदिपिकेत लिहीतात, त्राटक म्हणजे, एखाद्या लहान गोष्टीकडे निरखून, लक्षपूर्वक, आणि एकाग्र नजरेने पहात रहाणं. जोपर्यंत डोळ्यातून अश्रू येत नाही तोपर्यंत.    

त्राटक केल्यामुळे अनेक फायदे होतात. उदाहरणार्थ- एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढण्यास चालना मिळते. त्राटकाचा नियमित अभ्यास केल्यामुळे मन एकाग्र होते. त्राटकाचे दोन प्रकार आहेत. बहिरंग त्राटक आणि अंतरंग त्राटक.   

बहिरंग त्राटक म्हणजे एखाद्या बाहेरच्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक आणि एकाग्र नजरेने पहात रहाणं. बहिरंग त्राटक अंतरंग त्राटकाच्या तूलनेने सोप आहे. अंतरंग त्राटकामध्ये बाहेरील गोष्टीकडे नाही, तर, डोळं बंद करून एखाद्या गोष्टीचं मनामध्ये व्हिजुअलाइजेशन करून त्यावर लक्ष केंद्रीत करणे. 

योग गुरूंच्या सांगण्यानुसार, त्राटकाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने सूक्ष्म गोष्टीकडे एकाग्र नजरेने पहात रहायचं. जेणेकरून त्या वस्तूची हूबेहूब प्रतिकृती डोळे बंद केल्यानंतर दिसली पाहिजे. त्राटकाचा अभ्यास गोष्टींवर केला जाऊ शकतो. पण, सामान्यत त्राटक मेणबत्ती किंवा दिव्याच्या वातीवर केलं जातं. 

बहिरंग त्राटक करण्याच्या ५ स्टेप्स 

आधी सांगितल्याप्रमाणे, बहिरंग त्राटक म्हणजे एखाद्या बाहेरच्या सूक्ष्म गोष्टीकडे एकाग्र नजरेने पहाणं. 

1. शांत जागी बसा. मेणबत्ती किंवा दिवा डोळ्यांच्या उंचीवर येईल असा तीन-चार फूट लांब ठेवा. 

2. मेणबत्ती किंवा दिव्याची ज्योत स्थिर असेल याची काळजी घ्या. पद्मासन, सुखासन किंवा सिद्धासनात बसा. पाठीचा कणा ताठ असूद्यात. हात गुडघ्यांवर चिन मुद्रेत ठेवा.   

3. शरीर सैल सोडून द्या. डोळे बंद करा आणि त्राटक करण्यासाठी तयार व्हा. एक दिर्घ श्वास घेऊन श्वास सामान्य आहे याची खात्री करा. 

4. डोळे उघडून ज्योतीकडे एकटक, एकाग्र नजरेने पहात रहा. डोळे स्थिर ठेवा. पापण्यांची उघडझाप करू नका. मंद दिसणाऱ्या ज्योतीकडे पहात रहा. डोळ्यातून पाणी येईपर्यंत एकाग्र नजरेने ज्योत निरखून पहा.  

((Image Source: Yoga In Daily Life))

5. आता डोळे बंद करा. मनात कोणताही विचार येऊ देऊ नका. विचार आल्यास पुन्हा एकाग्र व्हा आणि ज्योतीचं प्रतिबिंब बंद डोळ्यांसमोर पहाण्याचा प्रयत्न करा. 

6. बंद डोळ्यासमोर ज्योत आता दिसू लागली असेल. ज्योत आजूबाजूला जात असेल तर पुन्हा एकाग्र नजरेने मध्यभागी आणण्याचा प्रयत्न करा. डोळ्यासमोरून ज्योत दिसेनाशी होईपर्यंत पहात रहा.  

त्राटकाचा अभ्यास कोणत्याही वेळी करता येतो. पण, प्रामुख्याने पोट रिकामं असेल तेव्हा त्राटक केलेलं चांगलं. त्यामुळे पहाटे किंवा झोपण्याच्या अगोदर याचा अभ्यास करावा. 

हठयोग प्रदिपिकेमध्ये दिसेल्या माहितीनुसार, तुम्ही कोणत्या देवाला मानत असाल तर त्याकडे एकाग्र नजरेने पहाणं यालासुद्धा त्राटक म्हणता येईल. 

अंतरंग त्राटक 

अंतरंग त्राटक म्हणजे मनामध्ये एकाद्या गोष्टीकडे एकाग्र नजरेने निरखून पहाणे. 

अंतरंग त्राटकाची सुरूवात बहिरंग त्राटकासारखीच आहे. फक्त यात डोळं बंद करून मनामध्ये एकाद्या गोष्टीकडे एकाग्र नजरेने पहाण्याचा प्रयत्न करावा लागतो. कारण, अंतरंग त्राटकामध्ये कोणत्याही बाहेरील गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रीत करत नाही. तर एखादी गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर व्हिजुअलाइज करण्याचा तुम्ही प्रयत्न करता. 

त्राटक केल्याचे फायदे काय?  

हठयोग प्रदिपिकामध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्राटकामुळे डोळ्यांचे आजार होत नाहीत. थकवा, कंटाळा येत नाही. त्राटकाचे मानसिक आणि शारीरिक अनेक फायदे आहेत. 

त्राटकाचा अभ्यास करण्याचा मुख्ये उद्देश म्हणजे, मन एकाग्र करण्याचा प्रयत्न.  

त्राटक केल्यामुळे डोळ्यांचे आजार बरे होण्यास मदत होते. डोकेदुखी होत नाही. 

2016 मध्ये त्राटक क्रियेचा काय फायदा होतो यावर संशोधकांनी अभ्यास केला होता. यात असं आढळून आलं की, त्राटक केल्यामुळे गोष्टींकडे लक्ष देण्याची सतर्कता वाढते cognitive flexibility आणि response inhibition होण्यास मदत होते. 

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4738033

शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी त्राटक खूप फायदेशीर क्रिया आहे. यामुळे मुलांमध्ये एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती वाढण्यास चालना मिळते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ताण कमी होतो आणि झोपण्याआधी त्राटक केल्यामुळे झोप चांगली लागते. 

संशोधकांच्या सांगण्यानुसार, त्राटकाचे वृद्ध व्यक्तींनाही अनेक फायदे होतात. पण, ज्या वृद्धांना डोळ्यांचा त्रास असेल त्यांनी खबरदारी घ्यावी. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्राटक तंत्राचा सराव करावा. नाहीतर डोळ्यांना इजा होण्याची शक्यता वाढते. 

Leave a comment